अल्पवयीन पिडीतेचा वियनभंग करणा-या आरोपीस तात्काळ केले जेरबंद
Accused of molesting a minor victim was immediately arrested
X
अल्पवयीन पिडीतेचा वियनभंग करणा-या आरोपीस तात्काळ केले जेरबंद
वाशिम:-दि.१२/०१/२०२२ रोजी बालाजी नगर कं.०१ कारंजा या भागात राहणारे फिर्यादी व पिडीत यांनी पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे येवुन फिर्याद दिली की,आरोपी नामे श्रीकृष्ण दौलत तायडे वय ७१ वर्ष रा.बालाजी नगर कं.०१ कारंजा यांचेकडे गेल्या ०३ वर्षापासून भाडयाने राहतात व नमुद। आरोपीची पत्नी बाहेरगावी गेली असुन जातांना तिने फि.स त्यांचेकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते फि.ची मुलगी पिडीत वय १२ वर्ष ही आरोपीचे घरात देवाजवळ दिवा लावण्यास गेली असता नमुद आरोपी हे तिच्या जवळ तेलाची एक छोटी बॉटल घेवुन गेले व तिला म्हणाले की,या औषधाने हातपाय दुखने ।' बसते तुला लावुन देवु का असे म्हटले त्यावर तिने लावु नका असे म्हटले असता तरी पण त्यांनी बॉटल मधील औषध काढुन तिच्या कपडयातुन हात टाकुन तिच्या छातीला तेल लावले व छाती दाबली अशा प्रकारची तक्रार दिली वरुन पो.स्टे.कारंजा शहर येथे अपराध क्रमांक २३/२०२२ क.३५४,३७४अ भादंवि,सह क.८ पोक्सो ,सह क.३(1)(डब्लु)(i)( ii)अजाजअप्रका कादयान्वये गुन्हा दाखल करुन तपासात घेतला गुन्हाचे तपासात पिडीत मुलगी हिची वैदयकीय तपासणी करुन गुन्हातील आरोपी यास तात्काळ ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे,सदर गुन्हाचा मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चण सिंह यांचे मार्गदशनात श्री.यशवंत केडगे उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा हे पुढील तपास करीत आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206