मागील ०२ महिन्यांत विनयभंग व पॉस्कोअंतर्गत अत्याचाराच्या ०४ गुन्ह्यांमध्ये आरोपींस सश्रम कारावासाची शिक्षा
Accused of 04 offenses of molestation and atrocities under POSCO in last 2 months sentenced to rigorous imprisonment
X
वाशिम:-शासनाच्या वतीने दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणेकरिता वारंवार शासन परिपत्रके/मार्गदर्शक सूचना प्राप्त होतात. त्यानुषंगाने वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी आपले अधिनस्त सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना वारंवार सूचना व मार्गदर्शन करून दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ व्हावी यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नाच्या फळस्वरूप माहे मे, २०२२ मध्ये पो.स्टे. मंगरूळपीर येथे दाखल गुन्ह्यात १० वर्षे कारावास व दंड तर पो.स्टे. मानोरा व पो.स्टे.आसेगाव येथील दाखल बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये आरोपींना १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड झाला आहे.याच पार्श्वभूमीवर काल दि.०५.०७.२०२२ रोजी पो.स्टे. रिसोड येथील विनयभंग व पॉस्कोच्या गुन्ह्यातील आरोपीस वि.न्यायालयाने ०३ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. पो.स्टे. रिसोड हद्दीत आरोपी शेख अख्तर शेख अकबर यांचे वर स्वतःच्या सख्ख्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पो.स्टे.रिसोड येथे दि.२४.०६.२०२१ रोजी कलम ३५४, ३५४ (अ), (क), (ड) भादंवि सह बाललैगिक अत्याचाराचे कलम ७, ८ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपीस घटनेच्या दिवशीच तत्काळ अटक करण्यात आली होती. आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असल्याने सदर प्रकरणाचा सखोल तपास करत वैद्यकीय व परिस्थितीजन्य पुरावे कौशल्यपूर्वक जमा करून तपास पूर्ण केला व ६० दिवसांचे आत सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. तब्बल १० महिन्यांच्या ट्रायलनंतर उत्कृष्ठ तपास, पुराव्यांची उपलब्धता,साक्षीदारांच्या साक्षीवरून दि.०५.०७.२०२२ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायालयात नमूद प्रकरणाचा न्यायनिवाडा झाला असून आरोपी शेख अख्तर शेख अकबर याचेवर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्याने त्यास ०३ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शिल्पा सुरगडे यांनी केला असून कोर्ट पैरवी म्हणून नापोकॉ./१९० अमर ठाकूर यांनी काम पाहिले.मा.पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे (IPS) यांचे मार्गदर्शनात टी.एम.सी. सेलचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक मनीषा तायडे पोलीस अंमलदार पोहेकॉ.संतोष निखाडे, नापोकॉ.विष्णू मोटे, पोकॉ. दीपक गिरी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत दोषसिद्धी संबंधाने विशेष प्रयत्न केले आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206