सचिन देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना ७ दिवस पोलीस कोठडी
Accused in Sachin Deshmukh murder case remanded to police custody for 7 days
X
प्रतिनिधी | दिग्रस
सिंगद पुलाखाली मृतदेह आढळलेल्या सचिन देशमुख याचा खून केल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आल्यानंतर दिग्रस पोलिसांनी मृतकाची पत्नी व तिचा प्रियकर यांना अटक केली. अधिक तपासासाठी शुक्रवारी दि.५ ऑगस्ट रोजी दिग्रस पोलिसांनी न्यायालयात आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील सिंगद येथील पुलाखाली एक मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर दिग्रस पोलिसांनी यवतमाळ येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अहवालात काही बाबींवर संशय आल्याने सदर प्रकरणात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. आकोट येथून पत्नीला भेटून निघाल्यानंतर सचिनचा मृतदेह सिंगद येथे कसा आला याबाबत तर्कवितर्क लावले जात होते मात्र अधिक खोलवर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्याकडून सुरू होता, यात सचिन देशमुख याच्या हत्येमागे सचिनची पत्नी व तिचा प्रियकर असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर शुक्रवारी दि.५ ऑगस्ट रोजी दोनही आरोपींना दिग्रस न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी दिग्रस पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडी मागणी केली. दरम्यान दिग्रस न्यायालयाने आरोपींना दि.१२ ऑगस्ट पर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर , पोलीस निरीक्षक धर्मा सोनुने यांच्यासह दिग्रस पोलीस करित आहेत.