Home > Crime news > डोळ्यात चटणी टाकुन पैसे जबरीने पळवल्याप्रकरणी आरोपींना अटक

डोळ्यात चटणी टाकुन पैसे जबरीने पळवल्याप्रकरणी आरोपींना अटक

Accused arrested for snatching money by throwing chutney in eye

डोळ्यात चटणी टाकुन पैसे जबरीने पळवल्याप्रकरणी आरोपींना अटक
X

डोळ्यात चटणी टाकुन पैसे जबरीने पळवल्याप्रकरणी आरोपींना अटक

२ देशी बनावटीचे पिस्तुलसह ४ जिवंत काडतुस,१ धारधार तलवार आणी सव्वा लाख रोख रक्कम जप्त,विविध कलमान्वये गुन्हे दाखल

मंगरुळपीर येथील प्रकरण

फुलचंद भगत/मंगरूळपीर

दिनांक १७ डिसेंबर रोजी तकारदार प्रभुसा गोविदसा डगवार, वय ६४ वर्ष, व्यवसाय अडत व्यापारी, रा. पिंपळखुटा ता. मंगरूळपोर जि. वाशिम हे दिवसभर आपले कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरूळपीर मधील दुकाना अडत दुकानासंबंधीचे कामकाज आटोपुन रात्री १०.०० वा. चे सुमारास पिंपळखुटा येथील रहवासी रामराव भिकाजी मैनकार, यांचे मोटारसायकलवर बसुन मंगरूळपीर येथुन ग्राम पिपळखुटा येथे जाण्यास निघाले. ग्राम चांभई फाटा येथुन गावाकडे ०१ कि.मी. गेल्यानंतर मागुन येणा-या मोटारसायकलवरील तिन इसमापैकी एका इसमाने तकारदास व त्याचे सोबत असलेल्या रामराव मैनकार याचे मोटारसायकलला लाथ मारून मोटारसायकल पाडली, तेव्हढ्यात मोटारसायकलवरील अनोळखी ०३ ईसमांनी खाली उतरून रामराव मैनकार याचे डोळयास मिरची पावडर लावली तकारदार प्रभुसा डगवार यांचे जवळील रोख १.२५०००/- रु. असलेली पैशाची थैली जबरीने हिसकावली व मोटारसायकलने मंगरूळपीरच्या दिशेने पळुन गेले. अशा तक्रारदाराचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे दिनांक १८.१२.२०२० रोजीचे रात्री ०१.०७ वा. अज्ञात आरोपीविरूध्द गुर.नं.१३५७/२०२० कलम ३९२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने ठाणेदार मंगरूळपीर यांनी गुन्हयाची तात्काळ माहिती मा. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिली. पोलीस अधीक्षक श्री. वसंत परदेशी यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. शिवाजी ठाकरे यांना तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी जावुन गुन्हयाचा अधिक तपास करण्याबाबत आदेशीत केले. पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे व त्याचे पथकाने रात्रीच घटनास्थळास भेट देवुन मंगरूळपीर येथील तपास पथकाचे मदतीने तपासाची चके फिरविली. आरोपीबाबत गोपनिय माहिती घेतली, आरोपीचे मागावर असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की,ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपीची बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन त्यांचे इतर साथीदारासंह सवासनी रोड, आणि पत्रकार कॉलनी मंगरूळपीर येथे आणखी गुन्हे केल्याची कबुली दिली.सदर गुन्हयात एकुण ०६ आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांचकडुन गुन्हयात जबरीने हिसकावेले रोख १.२५०००/- रू. व देशी बनावटीची पिस्तुल, ०२ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. गुन्हयात कलम ३९५ भादंवि सहकलम ३, २५ आर्म अॅक्ट चे वाढवुन गुन्हयाचा तपास सुरू आहे.


सवासनी रोडवरील घटनेसंबंधाने पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे गु.र.नं.१७१/१९ क ३९२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद असुन सदर गुन्हा सागर पुरूषोत्तम जउळकर, सुरेंद्र उर्फ बाळु रामदास बुधे, राहुल गजानन करवते, सुमित अरविंद बुधे, सैयद नासिर उर्फ सोनु, अब्दुल मतिन अब्दुल मन्नास यांनी केल्याचे निष्पन्न झाले असुन सुमित अरविंद बुधे, सैयद नासिर उर्फ सोनु, अब्दुल मतिन अब्दुल मन्नान यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन इतर ०३ आरोपींना ट्रन्सफर कार्यवाही करण्यात येत आहे.मंगरूळपीर शहरातील पत्रकार कॉलनी येथील घटनेच्या संबंधाने पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे गु.र.नं. १३५९/२० क ३९५ भादंवि गुन्हा नोंद असुन सदर गुन्हा सागर पुरूषोत्तम जउळकर, सुरेंद्र उर्फ बाळु रामदास बुधे, वय २९ वर्ष, रा. जांबरोड, मंगरूळपीर, राहुल गजानन करवते, वय २२ वर्ष, रा. गणेश नगर,मंगरूळपीर, मुकेश निरंजन पठाडे, वय २९ वर्ष, रा. अशोकनगर मंगरूळपीर, संदिप दिलीप जाधव,२४ वर्ष, रा. चांधई ता. मंगरूळपीर व इतर ०१ फरार आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असुन गुन्हयातील आरोपींना अटक ट्रान्सफर कारवाई करण्यात येत आहे.


उपरोक्त गुन्हयाचे तपासात असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोहम्मद फैजान रा. दिवानपुरा मंगरूळपीर हा आपले घरी अवैधरित्या शस्त्र बाळगुन आहे. मिळाले. सुमीत अरविंद बुधे, सैयद नासिर उर्फ सोनु, अब्दुल मतिन अब्दुल मन्नान, मोहम्मद फैजान अब्दुल कुददुस, रफीक बेग रशिदबेग यांना अटक करण्यात आली असुन वेगवेगळया आरोपीकडुन रोख रक्कम १,२५,०००/- रू,०२ देशी बनावटीचे पिस्तुल, ०४ जिवंत काडतुस, ०१ धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे.ऊपरोक्त आरोपीकडुन वाशिम जिल्हयातील इतर ठीकाणी घडलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्यादृष्टीने तपास सुरू आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. वसंत परेदशी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजयकुमार चव्हाण,ऊपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय पाटील, श्री. यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, धनंजन जगदाळे, यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी पोउपनि शब्बीर पठाण, सपोनि तुषार जाधव, पोउपनि मंजुषा मोरे, सपोउपनि भगवान गावंडे, पोना सुनिल पवार, अमोल इंगोले, राजेश राठोड, अश्विन जाधव, संतोष शेणकुडे, निलेश इंगळे, मोहम्मद परसुवाले, अमोल मुंदे, रवि वानखेडे, सचिन शिंदे, सुमित चव्हाण, ज्ञानेश्वर राठोड यांनी केली आहे.


प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 2020-12-20T21:19:48+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top