Home > Crime news > एसीबी ची कारवाई खंडाळा पोलिस स्टेशनच्या पोलिस नाईकाला अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले...

एसीबी ची कारवाई खंडाळा पोलिस स्टेशनच्या पोलिस नाईकाला अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले...

खंडाळा पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईकाला अडीच हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले..

एसीबी ची कारवाई खंडाळा पोलिस स्टेशनच्या पोलिस नाईकाला अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले...
X

एसीबी ची कारवाई खंडाळा पोलिस स्टेशनच्या पोलिस नाईकाला अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले...

खंडाळा पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईकाला अडीच हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले..

एसीबीने पोलिसाला लाच घेतांना पकडल्याने पोलीस वर्तुळात खळबळ..


प्रतिनिधी।पुसद

खंडाळा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले एनपीसी तथा पोलीस नाईकाला छत्रपती शिवाजी चौकातील मस्ताना कॅन्टीनमध्ये अडीच हजार रुपयांची लाच घेताना एसीबी रंगेहात पकडले आहे.येथील छत्रपती शिवाजी चौका लगत असलेल्या कॅन्टीन वर संध्याकाळी ४.४५ वाजताच्या दरम्यान पोलीस नाईकाला रंगेहाथ पकडल्याने पोलिस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.


मधुकर सिताराम राठोड वय 50 वर्षे असे लाच स्वीकारणाऱ्या एनपीसी, पोलीस नाईकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एनपीसी मधुकर राठोड यांनी 354 प्रकरणांमध्ये ज्यामध्ये महिलेची छेडछाड करणे व उत्तेजित होऊन महिलेला दुषित करण्याच्या हेतूने गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या पुसद तालुक्यातील फेट्रा येथे राहणाऱ्या एका 37 वर्षीय व्यक्तीला पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पुसद तालुक्यातील फेट्रा येथे राहणाऱ्या एका 37 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली होती. .


ठरल्याप्रमाणे लाचेच्या मागणीतील 2 हजार 500 रुपयाचा टप्पा घेण्यासाठी पोलीस नाईक मधुकर राठोड यांनी छत्रपती शिवाजी चौकालगत असलेल्या मस्ताना कॅन्टींगवर बोलाविले. कॅन्टीनमध्ये तंबू ठोकून बसलेल्या एसीबीने मधुकर राठोडला 2 हजार 500 रूपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. लाच घेताना पोलिस नाईकाला रंगेहाथ पकडले आणि पोलिस वर्तुळात एकच खळबळ माजली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधित कायदा 1988 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड ,अमरावतीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तथा अमरावतीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, तपास अधिकारी एन. बी. बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक एन.बी.बोराडे, पोलीस हवालदार नितीन टवलारकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दुर्गादास राठोड, पोलीस नाईक अरविंद राठोड, विनोद अवगळे, योगेश खोटे, रवी घरत,राहूल व्यवहारे यांनी कामगिरी बजावली आहे...

Updated : 27 Aug 2021 5:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top