शेंबाळपिंपरी येथे तलवारीसह युवकास केली अटक
A youth was arrested with a sword in Shembalpimpri
X
शेंबाळपिंपरी येथे तलवारीसह युवकास केली अटक
राजेश ढोले पुसद प्रतिनिधी
तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या तरुण युवकास खंडाळा पोलिसांनी अटक केली
सदरची कार्यवाही शेंबाळ पिंपरी येथील हॉटेल ढाबा परिसरात करण्यात आली आहे. अमोल कुरकुटे वय 25 तरोडा असे अटक केलेल्या तरुण युवकाचे नाव आहे.
शेंबाळपिंपरी ते एक युवक तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस चौकीतील पोलिस कर्मचारी यांना मिळाली असता त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतलि असता यावेळी एक युवक। हातात तलवार घेऊन फिरत असल्याचे दिसून आले पोलीस दिसतात त्या तरुण युवकाने पळ काढला.यावेळी पोलीस कर्मचारी आणि पाठलाग करून करून युवकास अटक केली.
त्याच्याकडील तलवार आणि मोटरसायकल जप्त केली.
व या तरुण युवकाविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी आर्म ऍक्ट नुसार गुन्हा नोंद केला असून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.
शेंबाळपिंपरी परिसरात अशाप्रकारे वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न होत असल्याने सामाजिक दृष्ट्या चिंता वाढली आहे.