नांदेड येथील तरुणाची पुसद येथे निर्घृण हत्या!
आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून घडली खुनाची घटना
X
नांदेड येथील तरुणाची पुसद येथे निर्घृण हत्या!
आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून घडली खुनाची घटना
राजेश ढोले पुसद प्रतिनिधी
पुसद शहरातील पार्वती नगर येथे नांदेड येथील एका फळ व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मोहम्मद फैसल अब्दुल करीम वय 23 वर्ष रा. नांदेड असे मृतकाचे युवकाचे नाव आहे.
मृतक हा फळाचा व्यापारी होता तो नांदेड येथून पुसद येथे फळाचा माल देत होता आज तो पुसद येथील त्याचे नातेवाईंकडे आला असता फळांचे पैश्याच्या वादातून आरोपींनी त्यांच्या सोबत वाद निर्माण करूम पोटात चाकू भोकसून निर्गुण हत्या केली.
याप्रकरणी वसंत नगर पोलीस ठाण्यात मोहम्मद रफिक अब्दुल अजीज वय 42 वर्ष राहणार पार्वती नगर पुसद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद अन्सार मोहम्मद हमजा, मोहम्मद मुख्तार मोहम्मद हमजा, मोहम्मद निसार मोहम्मद हमजा, आवेश खान अशपाक खान सह इतर दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आवेश खान अशपाक खान याला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध पोलिसात घेत आहे. घटनेचा पुढील तपास वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण नाचनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.