नरसीच्या मुख्य चौकातलगत असलेल्या एका इलेक्ट्रिकल दुकानाला लागलेल्या भीषण आग
A huge fire broke out at an electrical shop near Narsi's main square
X
नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर
नरसीच्या मुख्य चौकातलगत असलेल्या एका इलेक्ट्रिकल दुकानाला लागलेल्या भीषण आगीत जवळपास 80 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून रमजान ईद च्या सणासुदीच्या दिवशी हि घटना घडली आहे. आग विजवण्यासाठी जवळपास दोन तासाचा कालावधी लागला.नागरिकांची बघ्यांची गर्दी होती.तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती नरसीतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.रात्री उशिरापर्यंत आग विजवण्यासाठी यश मिळाले.
आज रमजान ईद असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते मुस्लिम बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सण साजरा करत होते.
नरसी चे माजी सरपंच शेख नवाब साब व विद्यमान सदस्य रफिक नवाबसाब यांचे नरसीच्या ग्रामपंचायत कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या असलेल्या रोशनी इलेक्ट्रिकल्स या दोन मजली दुकानात अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रुद्र अवतार घेतले खाली असलेल्या सर्व साहित्याची जळून खाक झाल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील कुलर फ्रीज सहित सर्व साहित्यांना आग लागली आगीचे स्वरूप एवढे भयानक होते की आग विझवणे मुश्किल बनले होते प्रतेक नागरिक आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते भर चौकात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची गर्दीही वाढली होती. रस्तादेखील जाम झाला होता अशा परिस्थितीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र पाटील भिलवंडे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, काँग्रेसअल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई, ज्येष्ठ पत्रकार गंगाधर भिलवंडे, सरपंच गजानन (उर्फ) पपु शिवाजीराव पाटील, पोलीस पाटील इब्राहिम बेग पाटिल, यांनी पुढाकार घेत अगोदर जमावाला दूर करून आग विझवण्यासाठी बिलोली देगलूर नायगाव येथील अग्निशामक दल वाहनांना पाचारण केले सर्वात प्रथम नायगाव येथील गाडी उपलब्ध झाली पण उपलब्ध पाण्याने आग विझली नाही आगीचे रुद्रावतार वाढत गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली तेव्हा जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी पाणी उपलब्ध करून दिली. नागरिकांच्या सहकार्यातून तब्बल दोन तासानंतर आग विझवण्यात यश आले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी मोलाचे सहकार्य करत एकतर्फी वाहतूक सुरू करत ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी मोठे शिताफीने कामगिरी बजावली या घटनेत या दुकानाचे जवळपास 80 लाखाचे नुकसान झाल्याचे माहिती मिळाली आहे दरम्यान आगीची घटना घडताच आजूबाजूला असलेल्या दुकानदारांनी आपापली वस्तू सुरक्षित
ठेवण्यासाठी साहित्य घेऊन पळापळ चालवली होती,मित्र परिवार तब्बल दोन तास चौकात जवळपास दोन हजार अधिक नागरिक उपस्थित होते.