Home > Crime news > आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका वस्तीगृह अधिक्षकावर हिंगणघाट पोलिसांनी पास्कोअंतर्गत गुन्हा दाखल..

आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका वस्तीगृह अधिक्षकावर हिंगणघाट पोलिसांनी पास्कोअंतर्गत गुन्हा दाखल..

A hostel superintendent has been booked under Pasco by the Hinganghat police for abusing a 13-year-old girl studying in an ashram school.

आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका वस्तीगृह अधिक्षकावर हिंगणघाट पोलिसांनी पास्कोअंतर्गत गुन्हा दाखल..
X

वर्धा जिल्हा संपादक

मोहम्मद इकबाल


हिंगणघाट दि.७ ऑगस्ट

चंद्रपुर जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका वस्तीगृह अधिक्षकावर हिंगणघाट पोलिसांनी पास्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला.

सदर बालिका हिंगणघाट येथील रहिवासी असून नुकताच १ महिन्यापुर्वी चंद्रपुर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत ८ व्या वर्गात प्रवेश घेतला.

सदर विद्यार्थीनीची प्रकृती बरोबर नसल्यामुळे तीचे कुटुंबीयांनी तीला हिंगणघाट येथे परत आणले,पीडित विद्यार्थिनीला घरी परत आणल्यानंतर पीडिता कुणाशीही न बोलता एकांतवासात राहु लागली,यावरून कुटुंबिय व शेजारी महिलेने तीला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता तिने झालेला प्रकार सांगितला.

तीचेसोबत ४ वेळा अतिप्रसंग करण्यात आला असून सदर प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती पिडितेने पोलिसांना दिली.

कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पास्कोसह भादंवी कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंद करीत आश्रम शाळेतील वस्तीगृहाचे अधिक्षकास अटक केली.

सदर प्रकरणी दखल घेऊन पोलिस अधीक्षक होळकर यांनी भेट दिली असून उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार कैलाश पुंडकर यांनी कारवाई केली.

Updated : 7 Aug 2022 2:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top