Home > Crime news > दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांची टोळी पोलिसांकडून जेरबंद

दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांची टोळी पोलिसांकडून जेरबंद

दरोड्यातील साहित्यासह 05 दरोडेखोर ताब्यात

दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांची टोळी पोलिसांकडून जेरबंद
X

वाशिम: रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत मालमत्तेचे गुन्हे घडु नयेत म्हणुन शहर व ग्रामिण भागात चार वाहणा व्दारे रात्रीची पेट्रोलींग करण्यात येते. आज दि. १२/०९/२०२२ रोजी पहाटे ०२.०० वाजता रात्र गस्त पेट्रोलींग दरम्यान वाशिम - बुलढाणा जिल्हयाचे हददीवर रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत काही इसम दरोडा टाकण्याचे तयारीत आल्याची माहिती पोलीस हवालदार पो. हे कॉ/ ८१८ विशाल ऐकाडे यांना मिळाली. या माहिती वरुन पोलीस निरिक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांनी तात्काळ ग्राम भापुर शिवारात शोध मोहीम सुरु केली. या दरम्यान ग्राम भापुर गावचे शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ६ इसम वाहनासह संशयास्पद स्थितीत दिसुन आले. पोलीसांना पाहुन सदर दरोडेखोर पळुन जात असतांना त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले. त्यांचे ताब्यातुन एक चाकु, लोखंडी तलवार, दोरी, दोन लोखंडी पाईप, मिरची पुड व एक तवेरा वाहन मिळुन आले. एक आरोपी अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. तर ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपीवर वाशिम, मेहकर, डोंणगांव, जानेफळ, पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असुन ते सराईत गुन्हेगार आहेत. सदर आरोपीवर पोलीस स्टेशन रिसोड येथे अपराध क्रमांक ५०१/ २२ कलम ३९९,४०२ भा.द.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भांबरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहायक पोलीस निरिक्षक त्रंबक गायकवाड, पो.हे.कॉ. विशाल ऐकाडे, राजेश अंबोरे, ना.पो.कॉ. मुखाडे, पो. शि. हेमंत सरकटे यांनी केले असुन सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत सुबनावळ करित आहे.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशीम

मो.8459273206

Updated : 12 Sep 2022 8:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top