Home > Crime news > वाशीम येथील भुमी अभिलेख कार्यालयातील महीला अधिकारी एसिबीच्या जाळ्यात

वाशीम येथील भुमी अभिलेख कार्यालयातील महीला अधिकारी एसिबीच्या जाळ्यात

तिस हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक

वाशीम येथील भुमी अभिलेख कार्यालयातील महीला अधिकारी एसिबीच्या जाळ्यात
X

वाशीम येथील भुमी अभिलेख कार्यालयातील महीला अधिकारी एसिबीच्या जाळ्यात

तिस हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक

फुलचंद भगत

वाशिम:-वाशीमच्या भूमिअभिलेख कार्यालयातील वर्ग ३ च्या उपअधीक्षक पदावर असलेल्या महिला अधिकारी यांना ३० हजाराची लाच घेतांना वाशीम लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. सौ. मायादेवी रघुनाथ तलवारे वय 42 वर्ष, वाशीम असे लाच घेणाऱ्या महिला अधिकार्याचे नाव असून त्यांच्यावर आरोपी यांचे विरुद्ध पोस्टे वाशिम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गट क्र 44 शेत शिवार कार्ली ता.जि. वाशिम मध्ये तक्रारदार व त्याच्या भावाचे नावे असलेल्या शेतीला लागून असलेले गट क्र 91 व गट क्र 92 यांची चुकीच्या पद्धतीने मोजणी झाल्याने तक्रारदार व त्यांच्या भावाच्या शेतीचा काही भाग गट क्र91 व 92 मध्ये गेला होता सदर चुकीची मोजणी दुरुस्त करून देण्या करिता गैरअर्जदार महिला यांनी ३०००० रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदार यांचे कडे पडताळणी कार्यवाही दरम्यान 30000/- रु ची मागणी करून आहे. आरोपी यांचे विरुद्ध पोस्टे वाशिम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मार्गदर्शन –

▶मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

श्री.देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

श्री. गजानन शेळके पोलीस उपअधीक्षक.ला.प्र.वी.वाशीम

▶️ सापळा व तपास अधिकारी – श्रीमती ममता अफूने, पोलीस निरीक्षक ला.प्र.वी.वाशिम.

▶ कारवाई पथक –

श्रीमती ममता अफूने, पोलीस निरीक्षक, पोहवा नितीन टवलारकर, पोहवा आसिफ शेख, रवी घरत, योगेश खोटे

Updated : 7 April 2022 4:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top