Home > Crime news > शेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह खामगाव तालुक्यातील घटना.

शेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह खामगाव तालुक्यातील घटना.

A farmer who went for a walk in the field saw a dead body in a well in Khamgaon taluka.

शेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह खामगाव तालुक्यातील घटना.
X

झेड. ए. खान (बुलडाणा जिल्हा)

खामगाव: शिरसगाव देशमुख तालुका खामगाव येथील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज 24 जुलैला दुपारी तीनच्या सुमारास खामगाव चिखली रोड वरील वृद्धाश्रमा मागील शेतातील विहिरीत हा मृतदेह दिसला. शिरसगाव देशमुख येथील शेतकरी सुनील कस्तुरे हे शेतात चक्कर मारायला गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह दिसला. त्यांनी ही माहिती शिरस गावच्या पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी खामगाव च्या सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. अमृत दे अंदाजे 20 ते 25 वर्षीय तरुणाचा पोलीस सूत्रांनी सांगितले.

Updated : 24 July 2021 3:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top