आमदारी घाट शिवारात महाविद्यालयीन तरुण युवकाचा गळा कापून खून
A college youth was killed by slitting his throat at Mlali Ghat Shivara
X
राजेश ढोले पुसद प्रतिनिधी
ग्रामीण भागात हत्येचे सत्र सुरूच् एका मागोमाग दुसरी घटना घडलयाने ग्रामीण भागात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालल्याने ग्रामीण भागात सुद्धा गुन्हेगारी जगताचे लक्ष लागले आहे.
अनोळखी इसमाचे प्रेत मिळताच दुसरी घटना काल दी,5 सप्टेंबर 2022 रोजी खंडाळा पोलिस स्टेशन अंतर्गत आमदरी येथील घाटामध्ये तरुणाची गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली त्यामुळे जिल्हा पोलिस यंत्रणेला गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठी उपाय योजना करावी लागेल असे तगडे आव्हान पोलिस यंत्रणा पुढे निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की खंडाळा पोलिस स्टेशन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद हिंगोली रोड वरील आमदारी घाटामध्ये खून झाल्याची घटना घडली.
या घटनेतील मृतक तरुण हा मांडवा गावातील रहिवासी असलयाचे माहिती मिळताच खंडाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार बालाजी सेंगेपल्लू व पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करण्यात आला.
या घटनेतील फिरयादी लोडबा दगडू ढोले राहणार मांडवा वय 38 वर्षे तालुका पुसद यांचा भाऊ बंडू ढोले यांचे आठ वर्षांपूर्वीच निधन झाल्याने त्यांचा मुलगा गजानन बंडू ढोले राहणार। मांडवा वय 19 वर्षे यांचे पालन पोषण याची संपूर्ण जबाबदारी घेतली त्यांचे शिक्षण मुळावा येथील महाविद्यालय मधये घेण्यासाठी तो दिनांक 3 सप्टेंबर 2022 रोजी अक्षय ढोबळे यांच्या एम एच 26- 82, 9299 स्प्लेंडर प्लस् या दुचाकी ने इसापूर येथील त्यांचे मामा पाईकराव यांच्याकडे गेला होता. परंतु तो परत न आल्याने त्याना फोन केला असता फोन बंद झाल्याने। नंतर लगेच मामाला फोन बराच बराच वेळ आधी मांडवा येथे आल्याचे सांगण्यात आले.सायंकाळी पाच पर्यंत तो परत न आल्याने पुसद ते शेंबाळ पिंपरी रोडवर आपल्या नातेवाइकाकडून त्याचा शोध घेण्यात आला असता आमदरी गावालगतच्या घाटात त्याने नेलेली मोटर सायकल रोडच्या बाजूला लॉक करून उभ्या अवस्थेत दिसली आजूबाजूला अंधार असल्याने वारंवार आवाज देऊनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही दरम्यान मिळालेली मोटारसायकल घरी आणण्यात आलि आज सकाळी मोटार सायकल मिळालेल्या परिसरात गजानन चा शोध सुरू केला असता शेतकरी संभाजी बुरकुले यांच्या शेतात् रोडच्या खालील बाजूस नाल्याजवळ जंगलात गजानन चा मृतदेह सापडला त्याच्या गळ्यावर जखम दिसून आली तसेच थोड्या अंतरावर ब्लड आढळून आली आहे.
याप्रकरणी अज्ञात इसमाने विरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात। आला या घटनेमुळे महाविद्यालयीन तरुण विद्यार्थ्याच्या हत्येने खळबळ उडालेल्या प्रकरणाने पोलीस यंत्रणेकडे गुन्हेगार शोधण्याचे आव्हान उभे झाले आहे.