Home > Crime news > वन कर्मचाऱ्याला मारहाण पोलिसात गुन्हा दाखल

वन कर्मचाऱ्याला मारहाण पोलिसात गुन्हा दाखल

A case of assault on a forest worker has been registered with the police

वन कर्मचाऱ्याला मारहाण पोलिसात गुन्हा दाखल
X

Date: 7 Jan 2022

वन कर्मचाऱ्याला मारहाण पोलिसात गुन्हा दाखल

दारव्हा ता, शहरातील आरा मशीनवर लाकूड कटाई सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली याप्रकरणी दारव्हा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामचंद्र नामदेव काठोडे (५१) वर्ष असे मारहाण झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे सदर वनरक्षक वनविभागात दारव्हा बीट मध्ये कार्यरत आहे दिनांक ६ जानेवारी रोजी साडे अकरा ते बारा वाजता दरम्यान शहरातील आठवडी बाजार परिसरात असलेल्या विश्वकर्मा आरा मशीनवर अवैध लाकूड कटाई सुरू असल्याची माहिती मिळाली त्यावरून वन कर्मचाऱ्याने संबंधितांना मनाई केली तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांना बोलावतो असे म्हटल्याने चिडलेल्या आरा मशीन वरील आरोपी अहमद खान बालम खान (३०) रा, दारव्हा करीमखान इमाम खान (३०) रा, भुरेखा नगर दारव्हा यांनी शासकीय कर्तव्य बजावत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून वनकर्मचारी यांच्यावर लाकडी पाटीने हमला करून जखमी केले याबाबतची फिर्याद दारव्हा पोलिसात दिल्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस करीत आहे.

सदर घटनेची माहिती दारव्हा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय करमळकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत दारव्हा येथील वनपाल आरडी जाधव करजगाव येथील वनपाल बी डी राठोड उत्तर दारव्हा चे वनरक्षक डी व्ही राठोड यासह मोठा फौज फाटा वनविभागाचा घटनास्थळी दाखल झाला होता एवढा मोठा फौज फाटा पाहून घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती.

Updated : 8 Jan 2022 6:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top