Home > Crime news > अवैधरीत्या दारुची वाहतुक व विक्री करणारे 03 ईसमांवर गुन्हा दाखल

अवैधरीत्या दारुची वाहतुक व विक्री करणारे 03 ईसमांवर गुन्हा दाखल

A case has been registered against 03 persons who illegally transport and sell liquor

अवैधरीत्या दारुची वाहतुक व विक्री करणारे 03 ईसमांवर गुन्हा दाखल
X

(फुलचंद भगत)

वाशिम:-दिनांक : 10/01/2023

दि. 10/01/2023 रोजी आम्ही API. योगेश सुखदेव इंगळे ठाणेदार पो.स्टे. धनज बु. 10:00 वा.पो.स्टे.ला हजर असतांना गुप्त बातमीदारकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, दोन ईसम धनज बु. गावाकडुन दुचाकीवर अवैधरीत्या विनापरवाना देशी दारुची वाहतुक करुन ग्राम दोनद गावाकडे घेवुन जात आहे. अशा खात्रीलायक बातमीवरुन आम्ही सोबत पो.स्टाफ PC. संतोष राठोड ब.नं. 816, LPC. दिपाली पोहरे ब.नं.1225 असे पो.स्टे. मधुन रवाना झालो आम्ही पोस्टाफ सह ग्राम भामदेवी येथे मुख्य चौकात जावुन पंचनाम्यातील नमुद पंचांना बोलावुन त्यांना पंच म्हणुन हजर ठेवले. काही वेळाने 11:50 वा. दरम्यान 01 दुचाकी मो.सा ग्राम धनज बु. गावाकडुन येतांना दिसली आम्ही पो.स्टाफ नी नमुद पंचासमक्ष सदर वाहनास हाताने थांबण्याचा ईशारा केला सदर वाहन चालकाने आम्हाला पाहुन त्याची मोसा. न थांबवीता ग्राम दोनद गावाकडे वळवुन जोराने निघुन गेला, खबरेप्रमाणे अवैध दारुची वाहतुक करणारी हिच मोटार सायकल असावी असे गृहीत धरुन सदर वाहनाचा आम्ही पो.स्टाफ व नमुद पंचांनी त्यांचा पाठलाग केला असता नमुद मो.सा. वरील वाहन हे दोनद गावातील प्लाटमध्ये शिरले व तेथिल एका गुराचे गोठयात त्यांनी त्यांचे गाडीवर वाहुन आनलेले 03 प्लास्टीकच्या पांढ-या रंगाचे पोते सदर गोठ्यात एका इसमाच्या मदतीने उतरवुन ठेवत असतांनाच त्यांना पकडण्यात आले त्यांचे ताब्यातील सदर खाकी पृष्ठाचे खोके पंचासमक्ष उघडुन पाहीले असता त्यामध्ये देशी दारु संत्रा बाँबी कम्पनीचे कागदी लेबल चिपकवले असलेले 90 एम.एल. प्लास्टीकची सीलबंद काँर्टर किंमत 35/- रु पती नग प्रमाणे असे एकुण 09 पृष्ठाचे खोक्यात 90 एम.एल. प्लास्टीकची च्या १०० नग देशी दारु संत्रा बाँबी कॉर्टर एकुण माल किंमत 31,500/- रु. चा मुद्देमाल त्यांचे ताब्यात विनापरवाना वाहतुक करीत असलेला मिळुन आला. सदर अवैध दारु विनापरवाना वाहतुक करीता गुन्हयात वापरलेली होन्डा कम्पनीची CD 110 DELUXE मो.सा. क्रमांक MH 37 AE 1410 व वाहन चालवीत असलेल्या ईसम नामे 1) दिनेश श्रीकृष्ण कराळे वय 32 वर्ष रा. येवता बंदी ता.कारंजा जि.वाशिम 2) मो.सा. वर पाठीमागे बसलेल्या ईसम नामे दत्ता महादेव इंगळे वय 25 वर्ष रा. वाढोण ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती तसेच 3) किशोर पुंडलीक वडवाले वय 40 वर्ष रा.दोनद बु. ता. कारंजा यांनी कलम 65(अ), (ई)मुं.प्रो.अॅक्ट, सहकलम 239/177,129/177, 130(1)/177, 3(1)/187 मो.वा.कायदा प्रमाणे गुन्हा केल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सा वाशिम, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सा. वाशिम, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सा. कारंजा यांचे मार्गदर्शन ठाणेदार API. योगेश सुखदेव इंगळे पो.स्टे. धनज बु., NPC. राहुल जयसिंगकार ब.नं. 841, PC. संतोष राठोड ब.नं. 816, LPC. दिपाली पोहरे ब.नं. 1225 यांनी केली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 12 Jan 2023 7:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top