अवैध दारू ,सडव्यासह 7 लाख 70 हजारांची मुद्देमाल जप्त
चामोर्शी तालुक्यातील विष्णुपूर येथील घटना स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई.



राहुल दिपक येनप्रेडीवार
म मराठी न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी चामोर्शी
मो ,8888013008 ,7020109839
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील विष्णुपूर जगलं परिसरात अवैधरित्या दारू गाळली जात असल्याची माहिती मिळताच चामोर्शी येथील स्थानिक गुन्हे शाखेने काल दि 27 मे 21 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत केलेल्या दोन कारवायांमध्ये अवैध दारू सडव्यासह 7 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे,
या प्रकरणातील आरोपी कालाचंद बिजय किर्तनीया ,कमल वासुदेव विश्वास , विजय रमेन विश्वास , जयंत माखन हलदार , मुकेश निदुर हलदार ,तसेच हाशी निरपीन शहा हे सर्व रा विष्णुपूर येथील आरोपी फरार झाले आहेत ,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या आदेशानुसार पोलीस पथक चामोर्शी परिसरात गस्त करीत असताना विष्णुपूर येथील गावाच्या जगलं परिसरात शेततळ्याच्या बाजूला अवैध गुळाची दारू हातभट्टी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकून ठेवला असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली, पोलिसांनी घटनास्थळी धाडटाकुल मुद्देमाल जप्त केला,
घटनास्थळी मोहफुलाचा सडवा नष्ट करण्यात आला, सर्व आरोपींविरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,