Home > Crime news > यवतमाळ शहरातील ०२ वरली मटका जुगार अड्डयावर धाड टाकुन केला २९,६२०/- रु चा मुददेमाल जप्त

यवतमाळ शहरातील ०२ वरली मटका जुगार अड्डयावर धाड टाकुन केला २९,६२०/- रु चा मुददेमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

यवतमाळ शहरातील ०२ वरली मटका जुगार अड्डयावर धाड टाकुन केला २९,६२०/- रु चा मुददेमाल जप्त
X

यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अवैध धंदयाची गोपनिय माहीती काढुन प्रभावी रेड कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या

दिनांक २१/११/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला पो.स्टे. यवतमाळ शहर हददीतील शासकीय रुग्णालय समोरील परिसर व पो.स्टे. लोहारा हददीतील दारव्हा रोडवरील गंगाकाशी लॉन परिसरात काही इसम वरली मटका नावाचा हारजीतचा जुगाराचा खेळ लोकांकडुन पैसे घेवून खेळवित आहेत अशी माहिती प्राप्त झाली होती त्यावरून लागलीच ०२ वेगवेगळी पथके तयार करुन छापा कारवाई करीता पाठविली असता पो.स्टे. यवतमाळ शहर हददीतील शासकीय रुग्णालय समोरील परिसरात वरली मटक्याची खायवाडी करणारे ०१) कुणाल अनंतराव कंगाले रा. कोटंबा ता. बाभुळगांव २) प्रभाकर गंगारामजी ठाकरे रा. वंजारी फैल यवतमाळ ३) अनिल शंकर टेकाम रा. गांधी नगर कळंब ४) सुरेश महादेव कुभलकर रा. मुबारकपुर ता. बाभुळगांव ५) हंसराज नामदेव कटके रा. वाघापुर पंचशील नगर असे लोक मिळून त्यांचे कडुन वरली मटका साहित्य व नगदी असा एकुण १९,३४०/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच पो.स्टे. लोहारा हददीतील दारव्हा रोडवरील गंगाकाशी लॉन परिसरात वरली मटक्याची खायवाडी करणारे १) सागर सुभाष माहुरे रा. देवी नगर लोहारा २) पवन संतोष यादव रा. चापडोह पुनर्वसन ३) विलास नथ्थुजी गायकवाड रा. नेताजी नगर यवतमाळ असे लोक मिळुन आले त्यांचे कडुन वरली मटका साहित्य व नगदी असा एकुण १०,२८०/- रु चा मुददेमाल मिळून आला.

अशाप्रकारे स्थागुशा कडील पथकाने यवतमाळ शहरातील ०२ वरली मटका अड्डयावर छापा कारवाई करुन वरली मटका खायवाडी करणारे एकुण ०८ आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण २९,६२० रु चा मुददेमाल हस्तगत केला असून आरोपी व मुददेमाल पुढील कार्यवाही करीता संबधीत पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात श्री. प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व त्यांचे पथकांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Updated : 22 Nov 2022 1:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top