वाशिम जिल्हयातील २ मोटार सायकल जप्त करुन २ मोटारसायकल चोर गजाआड
2 motorcycles seized in Washim district and 2 motorcycle thieves found
X
वाशिम जिल्हयातील २ मोटार सायकल जप्त करुन २ मोटारसायकल चोर गजाआड
वाशिम:- पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता पोलीस ठाणे हददीत नियमित गस्त घालुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविला आहे.
दिनांक ०६/०१/२२ रोजी फिर्यादी हिम्मत रामचंद्र गवळी रा पिंप्री सरहद ह.मु. शिवाजी नगर रिसोड ता. रिसोड यांची ०६.०१.२२ रोजी सकाळी १०.०० वा बस स्थानक परिसर रिसोड येथे त्यांनी त्यांची होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटारसायकल क एम एच ३७/ के ९७४५ उभी केली होती १५.०० वा सुमारास मिटीग वरून परत आले असता त्यांची नमुद मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली. अशा तकारी वरून पो.स्टे. रिसोड येथे अप नं. १२/२२ क ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद झाला.
पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा जाधव यांनी गोपनिय माहिती मिळवुन वरिष्ठांना सादर केली. त्या गोपनिय माहिती मिळवुन पथकाने रिसोड शहरात सापळा रचुन अतिशय शिताफीने आरोपी नामे १) राजदिप उत्तम कांबळे रा गजानन नगर रिसोड २) नागेश रूपचंद्र ताकतोडे रा. गणेशपुर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन पो स्टे रिसोड येथील ०१ गुन्हे व इतर ०१ अशा ०२ मोटारसायकल किंमत १०००००/- रू. जप्त करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला भविष्यात देखील त्यांनी अशाच प्रकारची उल्लेखनिय कामगिरी करावी करीता त्यांना प्रोत्साहन दिले.पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात,अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे,पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि अतुल मोहनकर, पोउपनि पठाण, पोहवा सुनिल पवार,पोना राजेश गिरी, राजेश राठोड, अश्विन जाधव,अमोल इंगोले,पोकॉ डिगांबर मोरे, अविनाश वाढे,चापोहवा मिलींद गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206