Home > Crime news > 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या

17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या

17-year-old student commits suicide by strangulation

17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या
X

17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या

मुकूटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या पठारपूर येथील 17 वर्षीय विद्यार्थीनीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी तिन वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.

झरी जामणी तालूक्यातील पठारपूर येथील श्रध्दा धनराज पेचे या कायर येथील महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीने घरी वडील नसल्याची संधी साधून घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तीचे वडील धनराज पेचे हे ग्राम पंचायत मध्ये शिपाई पदावर कार्यरत आहेत. कामानिमित्य ते कायर येथे आले होते. या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घराकडे निघून गेल्याची माहिती आहे. श्रध्दा या बारावीत शिक्षण घेणा-या विद्यार्थीनीने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहेेेे.

Updated : 13 Jan 2022 7:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top