देशी दारू च्या 1008 बाटल्या अवैध वाहतुक करतानी पोलिसांनी केले जप्त...
1008 bottles seized by police while transporting illegally
X
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी
मोहम्मद इक्बाल
दि.६ फेब्रूवारी
तालुक्यातील मौजा चिंचोली शिवारात देशी दारूच्या सुमारे
1008 बाटल्या अवैध वाहतुक करतांना पोलिसांनी एका कारवाईत जप्त केल्या असून या प्रकरणी हिंगणघाट येथील संत कबिर वार्ड रहिवासी प्रतिक राजु पंचभाई,गुलशन पौनीकर तसेच येनोरा येथील राजपाल फुलझेले यांचेसह एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून एकुण किं. 1,00,800 रुपये किमतीची देशी दारू तसेच दारुची अवैध वाहतुक करण्यासाठी वापरलेली पांढन्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्र. MH-02/CR-3010 तसेच एक जुना अॅन्ड्रॉईड विवो कंपनीचा
मोबाईल अशी एकूण 4लाख 5 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हिंगणघाट पोलिसांच्या पथकाने जप्त केला.
सदरची कारवाई ठाणेदार संपत चव्हाण, पो.हवा कैलास दाते, रवी वानखेडे, समीर गावंडे, लोहकरे, आशिष मेश्राम, आकाश कांबळे यांनी केली असून प्रकरणी 7 (अ), 83 म.दा.का. सहकलम 3(1), 18, 720/177 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.