Home > Crime news > बसमध्ये प्रवाशाच्या बॅगेतील पैशांची चोरी करण्याच्या प्रयत्नातील ०४ महिलांना अटक

बसमध्ये प्रवाशाच्या बॅगेतील पैशांची चोरी करण्याच्या प्रयत्नातील ०४ महिलांना अटक

04 women arrested for trying to steal money from a passenger's bag in a bus

बसमध्ये प्रवाशाच्या बॅगेतील पैशांची चोरी करण्याच्या प्रयत्नातील ०४ महिलांना अटक
X

(फुलचंद भगत

वाशिम:-बसमध्ये प्रवासी बनून प्रवास करत इतर प्रवाश्यांच्या पैश्यांवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या ०४ महिलांना कारंजा पोलिसांनी अटक केली आहे. मालेगाव येथील रहिवासी असलेल्या किराणा व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून सदर महिलांना ताब्यात घेत पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरु आहे.

दि.२३.०१.२०२३ रोजी मालेगाव येथील किराणा व्यावसायिक कारंजा लाड येथून किराणा माल आणण्यासाठी वाशिम-गडचिरोली बसने प्रवास करत असतांना कारंजा बायपासवरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ एक महिला लहान बाळाला घेऊन त्यांच्या सीटवर जागा नसतांनाही बाळाला दुध पाजण्याच्या बहाण्याने बसली. त्यावेळी फिर्यादीच्या मांडीवर असलेल्या पैश्याच्या बॅगवर मुद्दाम स्वतःकडील ओढणीसारखा कपडा टाकत त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न त्या महिलेने केला. त्यासाठी सदर महिलेस हटकले असता तिने व तिच्या सोबत असणाऱ्या इतर तीन महिलांनी फिर्यादीशी हुज्जत घालून वाद केला. फिर्यादीने बस सरळ पोलीस स्टेशनला घेण्याची भाषा केली तेव्हा मात्र त्या महिला माफी मागत होत्या. तेव्हा सदर महिला चोरी करण्याच्या उद्देश्यानेच बसमध्ये प्रवाशी बनून बसल्या असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने बस पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे नेऊन तक्रार दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पो.स्टे.कारंजा शहर येथे अप.क्र.२४/२३, कलम ३७९, ५११, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरु आहे. चौकशीदरम्यान सदर महिला ह्या अर्धापूर बस स्टॅँडजवळ, ता.अर्धापूर, जि.नांदेड येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरु आहे.

नागरिकांनी बसमध्ये प्रवास करत असतांना आपल्या किंमती वस्तू व साहित्याची काळजी घ्यावी व काही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.८४५९२७३२०६

Updated : 24 Jan 2023 2:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top