पुसद शहरात अवैधरित्या घातकशस्त्र बाळगणा-या एकास ताब्यात घेवुन केल्या ०२ धारदार तलवारील जप्त
02 sharp swords seized after arresting one illegally possessing deadly weapon in Pusad city
X
काही दिवसांपूर्वीच पुसद शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी शोधा करीता स्थानिक गुन्हें शाखेकडील एक पथक पुसद परिसरात होते अशातच दिनांक २१/११/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला पो.स्टे. वसंतनगर हददीतील अखेरत नगर पुसद येथे राहणारा शेख मुखलीस शेख सलाम हा आपले कब्जात घातक शस्त्र बाळगुन असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने लागलीच अखेरत नगर येथे पोहचुन शेख मुखलीस शेख सलाम वय २५ वर्षे याचे घराची मिळालेल्या गोपणीय माहिती वरुन घरझडती घेतली असता त्याचे घरझडती मध्ये ०२ लोखंडी धारदार तलवारी किमंत २,०००/- रु च्या मिळुन आल्याने जप्त करुन जप्त मुददेमाल व आरोपी शेख मुखलीस शेख सलाम वय २५ वर्षे रा. अखेरत नगर पुसद यास पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. वसंतनगर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात श्री. प्रदीप परदेशी पो.नि. स्थागुशा, पोना/ पंकज पातुरकर, पोशी मो. ताज सर्व स्थागुशा यवतमाळ, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथील वाचक सपोनि श्री. गणेश इंगोले पोना/ शुध्दोधन भगत पो.स्टे. पुसद शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.