Home > Crime news > *लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला पोलीस नाईक,15000 रूपयांची लाच घेताना केली अटक*

*लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला पोलीस नाईक,15000 रूपयांची लाच घेताना केली अटक*

* Naik caught in bribery department, arrested for accepting bribe of Rs 15,000 *

*लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला पोलीस नाईक,15000 रूपयांची लाच घेताना केली अटक*
X


करण आर.कोलगुरी

तेलंगाना राज्य प्रतिनिधि

चंद्रपुर जिला संपादक

मो.9373441679.

चंद्रपूर येथिल 28 वर्षीय एका युवकास सतत लाच मागुन त्रास देणार्‍या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 15000 रूपयांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की,

*पाथरी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई उमेश गोपाळा पोटावी पोलीस नाईक,ब.नं.245*

हा चंद्रपूर येथिल एका युवकाला सट्टा चालवत असल्याच्या कारणावरून वारंवार लाचेची मागणी करत होता. ह्यापूर्वी चंद्रपूर येथिल इंदिरा नगर भागात राहणार्‍या एका 28 वर्षीय युवकास पाथरी येथे सट्टापट्टी घेताना सदर पोलीस शिपायाने पकडले होते मात्र त्यावेळी त्याने युवकाकडुन 20,00 रुपयांची लाच घेऊन सोडून दिले होते.

मात्र त्यानंतरही पोलीस नाईक उमेश गोपाळा पोटावी हा तक्रारदार युवकास फोन करून वारंवार 20,00 रूपयांची लाच मागुन त्रास देत होता. पोलीस नाईक उमेश पोटावी ह्याच्या त्रासाला कंटाळून व लाच द्यायची इच्छा नसल्याने सदर युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. मिळालेल्या तक्रारीनुसार विभागाने सापळा रचला व त्यानुसार तडजोड करून 15000 रूपयांची लाच घेण्यास पोलीस नाईक पोटावी तयार झाला.

रचलेल्या सापळ्यानुसार आज दिनांक 14 जुलै रोजी पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, ला.प्र.वि. नागपूर व मिलिंद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर ह्यांच्या कुशल मार्गदर्शनात अविनाश भामरे पोलीस उपअधीक्षक ,पोह. मनोहर एकोणकर, नापोशि अजय बागेसर, पोशि नरेश ननावरे, रोशन चांदेकर , संदेश वाघमारे,चालक पोशी.सतिश सिडाम सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर ह्यांच्या चमूने पोलीस नाईक उमेश गोपाळा पोटावी ह्याला पंचासमक्ष 15,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली असुन पुढील कारवाई सुरू आहे.

Updated : 15 July 2021 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top