Home > Crime news > अन्न सुरक्षा विभागाने केला एक लाख 32 हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त

अन्न सुरक्षा विभागाने केला एक लाख 32 हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त

अन्न सुरक्षा विभागाने केला एक लाख 32 हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त
X

अन्न सुरक्षा विभागाने केला एक लाख 32 हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त

आर्णी (प्रतिनिधी): तालुक्यातील जवळा येथील बस्थानक परिसरातील गुटख्याच्या साठ्यावर अन्न सुरक्षा विभागाने सकाळी सहा च्या दरम्यान धाड टाकून तब्बल 1 लाख 32 हजार 325 रुपयांचे प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करून दोघांवर फौजदारी कारवाई केल्याची माहिती पोलीस स्टेशन आर्णी मार्फत प्राप्त झाली आहे.

अन्न सुरक्षा विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी जी.पी. दंदे, गो. वी. माहोरे व सं. ए. सूर्यवंशी समवेतच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील जवळा येथील सुरेश खंदार यांचे राहते घरी धाड टाकली. या धाडीत त्यांना बाबा गोल्ड सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, व्ही1 सुगंधित तंबाखू, एस आर 1 सुगंधी तंबाखू, नजर पान मसाला, न 05 सुगंधित तंबाखू, राजनिवास पानमसाला व इतर असा एकूण 1 लाख 10 हजार 325 रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला तसेच जवळा येथीलच शेख रहीम शेख फरीद याचे राहते घरी धाड टाकली असता त्याच्या ताब्यातून सुद्धा बाबा गोल्ड सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, व्ही1 सुगंधित तंबाखू, एस आर 1 सुगंधी तंबाखू, नजर पान मसाला, न 05 सुगंधित तंबाखू, सागर पान मसाला असा एकूण 22 हजाराचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींच्या विरुद्ध भादं वि कलम 188,269,270,272,273,328 व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे कलम 59 अन्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे फिर्याद देण्यात आली आहे. सदरची कारवाई सु. ग. अन्नपुरे सहआयुक्त अमरावती विभाग, कृ. रं. जयपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली.

●जवळा येथील बस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केल्या जात असल्याने वयोवृद्धा सह शाळकरी मुलंही या जीवघेण्या गुटख्याच्या आहारी जात असल्याने सामन्य जनतेतून चिंतेचा विषय बनला होता. मात्र अन्न सुरक्षा विभागाने धाड टाकून गुटखा जप्त केल्याने सामन्य जनतेतून आंनद व्यक्त केला जात आहे.

Updated : 13 March 2021 6:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top