Home > Crime news > ब्रेकिंग- बैल चोरुन नेणार्या आरोपीला आर्णी पोलिसांनी 24 तासात पकडले

ब्रेकिंग- बैल चोरुन नेणार्या आरोपीला आर्णी पोलिसांनी 24 तासात पकडले

ब्रेकिंग- बैल चोरुन नेणार्या आरोपीला आर्णी पोलिसांनी 24 तासात पकडले
X


जाकीर हुसैन- 9421302699

आर्णी/यवतमाळ : आज दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी पोलीस स्टेशन आरणी येथे फिर्यादी नामे सौ दुर्गा मनोज कोरवते वय 27 वर्ष राहणार भानसरा यांचे वडील नामे मेघराज देवराव आडे राहणार भानसरा यांचे मालकीचा एक ढवळ्या रंगाचा बैल किंमत 25000 रुपये हा दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्याचे घराचे आवारातून चोरून नेला अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक52/21 u/s 379 IPC प्रमाणे नोंद करून तपासात घेतला .

सदर गुन्ह्याचे तपासात फिर्यादीचे वडीलाचे मालकीचा बैल आरोपी नामे 1) मनोज जयवंत मेश्राम वय 23 वर्ष

2) बाळकृष्ण भिमराव दुर्वे वय 35 वर्ष राहणार दोन्ही पाळोदी तालुका आर्णी

3) गंगाधर जयवंता मेश्राम व 28 वर्ष राहणार जलंद्री तालुका आर्णी यांनी संगनमत करून चोरून नेत असताना सत्य गुढी पोस्ट सिंदखेड येथे नमूद आरोपी हे बैल चोरून नेताना मिळून आले त्यावरून सदर आरोपीस ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला असुन सदर ही कार्यवाही पोलीस हवालदार सतिष चौधार 455, पोलीस नाईक मनोज चव्हाण 2222, अक्षय ठाकरे 2253, मिथुन जाधव 2555 ,विकास खंदारे 2651 यांनी केली.

Updated : 27 Jan 2021 4:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top