रेती माफियांच्या मुसक्या आवळल्या!
X
-एकीकडे काेराेनाचा कहर आटाेक्यात आणण्यांसाठी अख्ख महसुल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र कामी असतांना चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्करांनी याच संधीचा फायदा घेत रात्राैला अवैध रेतीचा सपाटा लावला हाेता .परंतु अश्याही कठीण परिस्थितीत वेळ मिळेल तेव्हा व गुप्त माहितीच्या आधारे महसुल विभाग , पाेलिस विभाग , जिल्हा खनिकर्म विभाग व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात अवैध रेती तस्करांवर कारवायां करीत आहे ही माेहीम अद्याप सुरुच आहे. परंतु अश्या दंडात्मक कारवायांना न घाबरता काही जण अजुनही चाेरटी रेती वाहतुक करीत आहे .अश्यातच या अवैध रेती वाहतुकीची कुणकुण कानी लागताच राजूरा तालुक्यातील घिडसी साजाचे तलाठी विनोद खाेब्रागडे यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता सहा रेती तस्करांना आज सकाळी दणका देत त्यांना अवैध चाेरी प्रकरणी रंगेहात पकडले तरं काही टैक्टर चालकांनी कारवाईच्या भीती पाेटी घटनास्थळावरुन पळ काढल्याचे खुद्द विनाेद खाेब्रागडे यांनी या प्रतिनिधीस सांगितले .दरम्यान खाेब्रागडे यांनी हे अवैध रेती वाहने चंद्रपूर तालुक्यातील माेठा मारडा व राजूरा तालुक्यातील छाेट्या मारडा येथे पकडले .यातील काही वाहनांना पाेलिस पाटील यांचेकडे तर काही वाहनांना ग्राम पंचायतकडे ठेवण्यांत आले अाहे .वरील प्रकरणात आपला अहवाल त्यांनी तहसीलदार यांचे कडे तातडीने सादर केला असुन दंडात्मक कारवायां साेबत त्यांनी या रेती तस्करांवर पाेलिस कारवायां करण्यांचे अहवालात नमुद केलेे आहे .विनोद खाेब्रागडे यांच्या आजच्या या कारवायांमुळे राजू-यातीलच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे खराेखरचं राजूरा तहसीलदार व चंद्रपूर तहसीलदार या अवैध रेती तस्करांवर दंडात्मक कारवायां साेबतच पाेलिस कारवायां करतील काय या कडे सा-या चंद्रपूर जिल्ह्याचे आता लक्ष वेधले आहे .