बभुलगांव येथे खून,आरोपीला अटक
X
बाभूळगाव जी, यवतमाल
जुन्या वादावरून लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करून खून केल्याची घटना दि.17 मे च्या संध्याकाळी 8.30वाजताच्या दरम्यान बाभूळगाव येथील नेहरू नगर येथे घडली.
पुरुषोत्त भाऊराव गायकवाड वय 30 वर्षे असे मृतकाचे नाव आहे.
नेहरू नगर येथे राहणारा मृतक पुरुषोत्तम भाऊराव व त्याच्याच शेजारी राहणारा अक्षय रमेश गोटफोडे यांच्या दोघांत नेहमीच वाद होत होता मृतक यांची पत्नी हिची तब्बेत बरोबर नसल्याने मृतकाचे वडील हे मृतकच्या पत्नीला माहेरी नेऊन देण्यासाठी गेले होते .त्यामुळे तो एकटाच घरी होता. रात्री मृतक दारू पिऊन घरा समोर गादी टाकून झोपून असतांना आरोपी अक्षय गोटफोडे याने लोखंडी रॉड डोक्यावर हल्ल्या केला व पळून गेला. यात मृतक याचा डोक्याला जबरदस्त मार लागला त्यामुळे तो जागीच ठार झाला.मृतकाच्या भावाने बाभूळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली यवतमाळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, ठाणेदार वडगावकर, सहाय्यक ठाणेदार संदीप पाटील व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पळून गलेल्या आरोपीचा शोध घेऊन तीन तासात अटक केली.