Home > Crime news > गाेळीबार करुन युवकाची हत्या करणारे आराेपी पाेलिसांच्या तावडीत ! गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाड़े तथा एलसीबी पथकातील कर्मचा-यांची यशस्वी कामगिरी !

गाेळीबार करुन युवकाची हत्या करणारे आराेपी पाेलिसांच्या तावडीत ! गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाड़े तथा एलसीबी पथकातील कर्मचा-यांची यशस्वी कामगिरी !


चंद्रपूर :-जिल्ह्यातील वराेरा येथील रहिवाशी असलेल्या आबीद शेख नावाच्या युवकाची काल शनिवार दि.१५मे ला बंदुकीतुन गाेळ्या झाडुन हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली हाेती. दरम्यान या घटनेतील आराेपीं फरार झाले हाेते .पाेलिसांनी या बाबतीत लगेच चाैकशीची चक्रे फिरवून सदरहु घटनेतील दाेन आराेपींना आज( रविवार दि .१६मे ला )आपल्या ताब्यात घेतल्याचे व्रूत्त आहे . अबिद शेख या युवकाची संध्याकाळच्या सुमारास मारेक-यांनी गोळीबार करून हत्या केली हाेती . त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरुन फरार झाले हाेते .या घटनेतील आराेपींना जोपर्यंत अटक हाेत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अश्या प्रकरची ठाम भूमिका मृतकच्या परिवारांनी घेतली हाेती .या घटनेचे गांभीर्य व परिस्थिती लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी लगेच तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे दिली . त्यानंतर पाेलिस पथकांनी विदर्भात अतिदुर्गम जिल्हा म्हणून आेळखल्या जाणा-या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील एका जंगलातून गुप्त माहितीच्या आधारे त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. देवा नौकरकर व गौरव वाळके अशी त्या आराेपींची नावे असुन सध्या ते पाेलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते .

वराेरा येथील अंबादेवी वॉर्ड येथे काल अबिद शेख हा आपल्या काही मित्रांस बसला होता. त्या ठिकाणी आराेपी आपल्या सहका-यासह तेथे आले. काही क्षणातचं आबिद शेख यांच्यावर त्यांनी गोळीबार करून ते पसार झाले . या घटनेत अबिद हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती हाेताच वरोरा पोलिस स्टेशनचे पाेलिस घटनास्थळी दाखल झाले या वेळी घटनास्थळावरून त्यांनी बंदूक, व एक दुचाकी वाहन जप्त केले. जखमी अबिद शेख याला तातडीने वराेरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यांत आले ,परंतु वैद्यकीय अधिका-यांनी त्याला त्याच वेळी मृत घोषित केले .घटनेची माहिती मिळताच मृताचे कुटुंबीय नातेवाईकांनी व लाेकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली. जोपर्यंत मारेक-यांना अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांचे परिवाराने घेतली होती.चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे या तपासाची सूत्रे सोपविली. त्यानंतर एलसीबीचे तीन, वरो-याचे एक भद्रावतीचे एक आणि सायबर सेलचे एक पथक वेगवेगळ्या ठिकाणी आराेपींच्या शाेधार्थ रवाना करण्यात आले. दरम्यान एलसीबीच्या पथकाने वरो-यातील दोन युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी ते दोघे मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात असल्याचे समोर आले. सायबर सेलने मुख्य आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. यात देवा नौकरकर, गौरव वाळके हे दोघे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहेरीच्या दिशेने रवाना झाले. अहेरी जंगल परिसरात शोध मोहीम राबवून लपून बसलेल्या देवा नौकरकर, गौरव वाळके या दोघांना ताब्यात घेतले.चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस विभागाचे पथक सदरहु घटनेबाबत अधिक चाैकशी करीत आहे.

Updated : 2021-05-16T22:31:40+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top