Home > Crime news > वाशिम जिल्हा पोलिस दलाची धडाकेबाज कारवाई;दारूअड्ड्यावर धाडी

वाशिम जिल्हा पोलिस दलाची धडाकेबाज कारवाई;दारूअड्ड्यावर धाडी

वाशिम जिल्हा पोलिस दलाची धडाकेबाज कारवाई;दारूअड्ड्यावर धाडी
X

फुलचंद भगत

वाशिम:-१६/०५/२०२१ रोजी मा. पोलिस निरिक्षक साहेब, वाशिम शहर यांना गोपणीय माहीती मिळाली.

की, पोस्टे वाशिम शहर हददीमध्ये भवानी नगर, शिवाजी मार्ग वाशिम सुमित ग्राफीक्सच्या मागे एका टीनाच्या शेडजवळ मोठया प्रमाणात अवैध देशि दारुचा साठवणुक करुन विक्री करत असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठीकाणी छापा टाकुन अवैध रित्या देशि दारु साठवणुक करुन विक्री करणारे आरोपी नामे गंजेद्र सत्यनारायण नागरेपल्लु, वय ४९ वर्ष, रा. शिवाजी चौक, भवानी नगर, वाशिम यास ताब्यात घेवुन त्यांच्या हातात असलेल्या नॉयलॉनच्या थैलीमध्ये टँगो वोल्का न. १ कंपनीच्या १८० एम.एल.च्या २४ क्वार्टर एकुण कीमत १४४०/-रुपये देशि दारुच्या क्वार्टर मिळुन आल्या. सदर देशि दारुच्या क्वार्टर त्यांच्याकडे कशी काय आली? याबाबत विचारणा केली.

असता त्याने सांगितले की, सदरची देशि दारु तो टीनाच्या शेडमधुन आणुन लोकांना अवैधरित्या विक्री करीत असल्याचे सांगितले. त्यांनतर सदर आरोपीच्या ताब्यातील टीनाचे शेडचे शट्टर उघडण्यास सांगितले असता त्यांने सदरचे शेडचे शट्टर उघडुन आम्ही पाहणी केली असता सदर टीनाच्या शेडमध्ये लावणी, भिंगरी देशि दारुचे पुष्ठाचे बॉक्स दिसुन आलेत. सदरचे बॉक्समध्ये लावणी कंपनीच्या देशी दारुच्या १८० एम.एल.चे एकुण १२ सिलबंद बॉक्स एकुण कीमंत ३६०००/-रुपये त्यांनतर भिगरी कंपनीचे १८० एम.एल.चे १० सिलबंद एकुण कीमत ३००००/-रुपये तसेच भिंगरी कंपनीची ९० एम.एलच्या १०० क्वार्टर एकुण कीमत ३२००/- रुपये असा एकुण ७०६४०/- कीमत दारुचा अवैध साठवणुक आणि विक्री करतांना मिळुन आला.

सदर आरोपी नामे गजेंद्र सत्यनारायण नागरेपल्लु, वय ४९ वर्ष, रा. शिवाजी चौक, भवानी नगर, वाशिम यांने मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेश क्र. कक्ष-३/आ.व्य/ कलि/का.बी./१०२१/२१ दिनांक १४/०५/२०२१ चे आदेशाचे उल्लघंन करुन अवैधरित्या देशि दारुची साठवणुक करुन ठरवुन दिलेल्या कालावधी व्यतिरिक्त दारुची साठवणुक आणि विक्री करतांना आढळुन आला करिता सदर आरोपी विरोधात कलम १८८ भांदवी सहकलम ६५ (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.ऊपरोक्त कारवाई मा. पोलिस अधिक्षक श्री. वसंत परदेशी, भापोसे, अपोअ मा. श्री. विजयकुमार चव्हाण,ऊपविपोअ श्री. यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक धृवास बावनकर, सपोनि रमाकांत खंदारे, सपोनि दानडे, पोउपनि सतोष जंजाळ, तायडे व सोबत स्टाफ नापोशि मालवे/ ब. न. ५१५, पोशि माजे/ ब. न. २१०, पोशि मुकाडे/ ब. न. १३५७, यांच्या पथकाने केली.

Updated : 16 May 2021 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top