Home > Crime news > मटका व्यवसायकाची हत्या ! वराेरा नगरीत उडाली खळबळ ! पाेलिस चाैकशीला आरंभ !

मटका व्यवसायकाची हत्या ! वराेरा नगरीत उडाली खळबळ ! पाेलिस चाैकशीला आरंभ !

मटका व्यवसायकाची हत्या ! वराेरा नगरीत उडाली खळबळ ! पाेलिस चाैकशीला आरंभ !
X
चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा नगरीत भरदिवसा एका मटका व्यवसायीकाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे .

वरोरा शहरात अश्या घटना काही दिवसांच्या अंतराने घडत असुन दाेन दिवसापूर्वि याच वराेरा नगरीत खुनाची एक घटना घडल्याचे सर्वश्रूतच आहे . अवैध व्यवसाय हे मूळ कारण असल्याचे आता सर्वत्र बाेलल्या जात असुन गत दोन दिवसांपूर्वी गांधी चौकात निलेश नावाच्या एका मुलाने 26 वर्षीय अलाम नावाच्या मुलाचा खून केला होता. .त्याचा तपास व चाैकशी अद्याप सुरू असतांना आता हा दुसरा खून झाला आहे . या घटनेमुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते .

आज शनिवार दि.15 मे ला संध्याकाळी दोन ते तीन अनाेळखी इसमानी वराेरा येथील महादेव मंदिर समिप असलेल्या झोपडीत साजिद शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून केला असल्याची खळबळजनक घटना घडली .मृतक साजिद शेख हा आझाद वार्डात राहत असून तो अगोदर सट्टा व्यवसाय करीत होता. तो एकटा असल्याची संधी साधत दोन ते तीन आरोपींनी त्याच्यावर बंदुकीतुन दोन गोळ्या झाडल्या असल्याची चर्चा ऐकिवात आहे. दरम्यान या घटनेतील आराेपींचा पाेलिस कसुन शाेध घेत आहे.

Updated : 2021-05-15T23:58:11+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top