Home > Crime news > शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेत्यांच्या वाहनाला गडचांदूर जवळ भीषण अपघात

शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेत्यांच्या वाहनाला गडचांदूर जवळ भीषण अपघात

शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेत्यांच्या वाहनाला गडचांदूर जवळ भीषण अपघात
X

चंद्रपूर / गडचांदूर : शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते प्रभाकर दिवे ह्यांच्या वाहनाला गडचांदूर जवळ भीषण अपघात झाला असुन ह्या अपघातात प्रभाकर दिवे गंभीर जखमी झाले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार गडचांदूर राजुरा मार्गावर असलेल्या थुटरा गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंप मधुन निघालेल्या ट्रकला प्रभाकर दिवे ह्यांच्या कारने जोरदार धडक दिली त्यात कारचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला असुन प्रभाकर दिवे ह्यांच्या डोक्याला जबर मार लागला. चंद्रपूर येथे हलविण्यात आल्यानंतर त्यांचे सिटी स्कॅन करण्यात आले असुन डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचे एम आर आय करण्यात येत असुन त्यानंतर त्यांच्या प्रकृती बद्दल अधिक माहिती कळू शकेल असे त्यांच्या निकटवर्तीयाने कळविले आहे.

Updated : 14 May 2021 4:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top