Home > Crime news > कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन केली आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन केली आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन केली आत्महत्या
X

इकबाल पहेलवान म. मराठी न्यूज नेटवर्क - ९९२३४५१८४१


वर्धा / हिंगणघाट : सततच्या संचारबंदीमुळे आर्थिक स्थिति खालावल्याने कर्जबाजारी झालेल्या ३८ वर्षीय विवाहित युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज दि.१४ रोजी स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथे मध्यरात्री घडली.

स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी प्रविण अशोकराव नगराळे (३८) याने शुक्रवार रोजी मध्यरात्री १२ .५० वाजता आपल्या घरिच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यादरम्यान मृतकाने ओरडल्याने घरातील मंडळी जागे झाली.मृतक गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, यादरम्यान मृतक प्रविण याचेवर ६ लाख कर्ज असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिट्ठी पोलिसांना मिळाली असून सततच्या संचारबंदीमुळे कर्जबाजारी झाले असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. मृतक आकाश याचा आंबेडकर चौक येथे भंगारचा व्यवसाय होता.सततच्या लॉकडाउनमुळे एक महिन्यापासुण त्याचे दुकान बंद आहे व त्याने ज्याच्याकडून पैसे कर्जाने घेतले,ते पैशयासाठी तगादा लावला होता, सततचे फोन येत असल्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे त्याने चिठ्ठीमधे लिहले असल्याची माहिती आहे.

मृतकाला दोन मुले व आई,पत्नी असा परिवार आहे. याअगोदरच्या लाॅकडाऊनमधेसुद्धा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

सततच्या संचारबन्दीमुळे अनेक व्यावसायिक,कामकारी कर्जबाजारी झाले असून त्यांना कुटुंबियांचा उदरनिर्वाह करने कठिण झाले आहे. शहरात आर्थिक अडचणीमुळे याआधीसुद्धा स्वामी विवेकानंद वॉर्ड येथील विवाहित युवकाने आत्महत्या केली होती.

सततच्या संचारबंदीमुळे आज मृतक आकाश याने केलेली दुसरी आत्महत्या आहे.

सदर प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे,पोहवा महेंद्र आकरे हे पुढील तपास करीत आहे.

Updated : 14 May 2021 3:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top