कुख्यात गुंड आरिफ शहा नामक युवकाची निर्घुन खुन
X
यवतमाळ दि.११ मे -: येथील रोहिले बाबा झोपडपट्टी नविन भाजी मंडीच्या मागील परिसरात रात्रीच्या सुमारास युवकाची हत्या करण्यात आली असुन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक हा आरिफ शहा आहे.कुख्यात गुंड याच्या शिरावर अनेक गुन्हे नोंद असल्याचे सांगण्यात येते.त्या ठिकाणाहून एक युवकाचा मृतदेह रोहिले बाबा झोपडपट्टी जवळ पडुन असल्याची माहिती पोलिस नियंत्रणेला कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर,स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदिपसिंह परदेशी,यवतमाळ शहर पोलीस निरीक्षक प्रदिप सिरस्कर यांनी श्वान पथकासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मृतदेह कुख्यात गुंड आरिफ शहा याचा असल्याचे समजले.
आरिफ शहा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून,खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याचा खून कोणी आणि का केला हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.मात्र पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.घटना स्थळी पाहणी केली असता साथीदार यांच्या सह मद्यप्राशन केल्याचे लक्षात आले त्याठिकाणी दारुच्या बाटल्या,पाण्याच्या बाटल्या व ग्लास आढळुन आले.आरिफचा खुन झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने रात्रीच्या अंधारातही बघ्याची मोठी गर्दी जमा झाली होती व कोरोणाची खबरदारी घेत पोलीसांकडुन जमा झालेल्या नागरिकांना पांगविण्यात आले पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहे.