यवतमाळ मध्ये 'रेमडीसिवीर'चा काळाबाजार; डॉक्टर, मेडीकलचालकासह चौघांना अटक
X
यवतमाळ :
स्थानिक गुन्हे शाखेची कळंब , यवतमाळात कारवाई
जिल्ह्यात कोरोनाने पाय घट्ट रोवले असून, रुग्ण संख्याही झपाट्याने वाढली आहे. शासकीय व खाजगी कोरोना सेंटरमध्ये बेड उपलब्ध नसून, आरोग्य यंत्रणा तोडकी पडत आहे. रुग्णांना देण्यात येणा-या रेमडीसिवीर या इजेक्शनचा तुटवडा निर्माण करून काळ्या बाजारात विक्री करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब येथे सापळा रचुन या काळाबाजाराचा पर्दाफाश करुन ९ इजेंक्शन जप्त कले. तर बोरी महल प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर अक्षय तुंडलवार, मेडीकल संचालक श्रावण, वॉर्ड बॉय सौरभ आणि एका महिलेला ताब्यात घेतले.
जिल्ह्यातील कोरोना सेंटरमध्ये हजारो रुग्ण उपचार घेत आहे. या रुग्णांसाठी असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून चढ्या दराने विकून काळाबाजार सर्रास होत आहे. कळंब येथे रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे आज शनिवारी कळंब येथील पुलाजवळ सापळा रचुन एका व्यक्तीला पकडले. यावेळी पोलिसांनी कसुन चौकशी करून शासकीय रुग्णालयात दिली जाणारे ३ इंजेक्न जप्त करून बोरी महल प्राथमिक आरोग्य केंद्राचा डॉक्टर अक्षय तुंडलवार, मेडीकल संचालक श्रावण यांना ताब्यात घेतले. त्यांची पुन्हा कसुन चौकशी केली असता वॉर्ड बॉय सौरभ याचाही सहभाग असल्याचे समोर आले. तसेच यामध्ये यवतमाळ येथील महिलेचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी यवतमाळ येथील तहसील चौकात सापळा रचुन महिलेला ताब्यात घेवून तीच्याकडून ६ इंजेक्शन जप्त केले. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जुनघरे, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, विशाल भगत, कविश पालेकर व पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी केली.