Home > Crime news > मंगरुळपीर येथील तडीपार केलेला आरोपी फरारच!

मंगरुळपीर येथील तडीपार केलेला आरोपी फरारच!

मंगरुळपीर येथील तडीपार केलेला आरोपी फरारच!
X

मंगरुळपीर: येथील संतोष ऊर्फ बाळू दिनकर काळे (वय ४५ रा. संभाजी नगर मंगरुळपीर) याच्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या १२ एप्रिलच्या आदेशानुसार पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. परंतु तो अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेबाबत उपविभागीय दंडाधिकारी मंगरुळपीर एस.वि. मुळे यांचे आदेश फौजदारी कलम ५६ (अ) (ब) मु.पो कायदा मौजे मंगरुळपीर अन्वये १२/४/२०२१ पासून वाशिम जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्याचा आदेश प्राप्त झाला. त्या अनुषंगाने काळे यांना पो.स्टे. ला बोलावून घेऊन ठाणेदार धनजंय जगदाळे यांच्यासमक्ष आदेशाची प्रत तामील करण्यात आली. त्यांचा प्रश्न उत्तर फॉर्म भरून घेण्यात आला असता हद्दपारी काळात ते कोठे राहणार यांचा जबाब नोंदविला असता त्यांचे नातेवाईक (पातूर जि. अकोला) येथे राहणार असल्याचे सांगितले. परंतु यानंतर तोपोलिसांकडे न येता फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असून, नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे तसेच त्याला सहकार्य करणाऱ्यांवरसुद्धा कारवाई केली जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.

Updated : 28 April 2021 4:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top