Home > Crime news > कारंजा शहर येथे न्यु हिंदुस्थान एजेंसी येथुन एकुण ६४ नग ऑक्सीजन सिलेंडर जप्त

कारंजा शहर येथे न्यु हिंदुस्थान एजेंसी येथुन एकुण ६४ नग ऑक्सीजन सिलेंडर जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

कारंजा शहर येथे न्यु हिंदुस्थान एजेंसी येथुन एकुण ६४ नग ऑक्सीजन सिलेंडर जप्त
X

फुलचंद भगत

वाशिम:-कोव्हीड १९ चा संसर्ग वाढल्याने संपुर्ण देशात ऑक्सीजन अभावी बरेच लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.त्या संदर्भाने मा. पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाशिम जिल्हयातील कारंजा भागात गुन्हेगारी वाँच पेट्रोलिंग करीत असतानाच दिनांक २६/०४/२०२१ रोजी सकाळी ०८.०० वाजता कारंजा शहर पोलीस ठाणे हददीत गोपनीय बातमीदारा मार्फत कारंजा ते नागपुर रोडवरील यशोतिरथ कॉलनी महाराष्ट्र नगर मधील हिंदुस्थान स्केप हया ठिकाणी संशयितरित्या बोलेरो पिकअप या गाडीतुन एका ट्रकमध्ये ऑक्सीजनचे सिलेंडर भरत असल्याबाबतची माहिती मिळाली.

सदरच्या माहितीची शहानिशा करण्यासाठी ठिकाणी पहाणी केली असता पिक अप क्रमांक एम एच २९ एटी ०८१८या वाहनातुन ट्रक क्रमांक एमएच २१ ६००१ मध्ये काही इसम ऑक्सीजन सिलेंडर भरताना आढळुन आले. संशयावरुन सदर सिलेंडरची अधिक माहीती घेतली असता पिक क्रमांक एम एच २१ एटी ०८१८ मध्ये एकुण २९ ऑक्सीजन सिलेंडर व ट्रक क्रमांक एमएच २१-६००१ मध्ये एकुण २६ ऑक्सीजन सिलेंडर तसेच न्यु हिंदुस्थान एजेंसी दुकानात जमिनीवर एकुण ०९ रिकामे सिलेंडर आढळुन आले. सदर बाबत दुकानाचे मालक रियाज अहमद गुलाम रसुल वय ४० वर्षे रा झोया नगर कारंजा लाड जि. वाशिम यांचे कडे विचारपुस केली असता त्यांनी ऑक्सीजन सिलेंडर व्यवसायाचे त्याचेकडे लायसन्स असुन सदरचे लायसन्स हे न्यु हिंदुस्थान एजेंसी नागुपर औरंगाबाद हायवे रोड महाराष्ट्र नगर कारंजा लाड या नावे असल्याचे सांगितले. तसेच त्यांचेकडे सदर सिलेंडर कोठुन खरेदी केले याबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचे सिलेडर हे AMOHAOXY INDUSTRIAL GASES PVT.LTD नागुपर येथुन खरेदी केल्याचे सांगितले. सदरबाबत कागदपत्रांची तपासणी केली असता सदरचे सिलेंडर हे जवाहर हॉस्पीटल कारंजा यांचे नावे खरेदी केल्याचे दिसुन आले. परंतु त्याबाबत त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, म्हणुन सदर ठिकाणावरुन ५५ भरलेले व ९ रिकामे ऑक्सीजन सिलेंडर, बोलेरो पिक अप क्रमांक एमएच २९ एटी ०८१८ व ट्रक क्रमांक एमएच २१ ६००१ असा एकुण १६,९७,५००/- रु चा माल सिआरपीसी कलम १०२ प्रमाणे जप्त करण्यात आला असुन सदरचा माल हा पोस्टे कारंजा शहर येथील मुददेमाल कक्षात जमा करण्यात आला आहे. सदर बाबत मा. जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वाशिम यांना अहवाल सादर करण्यात येणार असुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.नमुद कार्यवाहीत मा. पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय कुमार चव्हाण, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सपोनि अतुल मोहनकर, अजयकुमार वाढवे, पोलीस नाईक किशोर चिंचोळकर,मुकेश भगत, अमोल इंगोले, पोलीस शिपाई राम नागुलकर, प्रविण राऊत,चालक राठोड यांनी सहभाग नोंदविला.

Updated : 27 April 2021 10:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top