Home > Crime news > घराच्या जागेवरून झालेल्या वादात एकाचे डोके फोडल्याची घटना.

घराच्या जागेवरून झालेल्या वादात एकाचे डोके फोडल्याची घटना.

जागेच्या वादावरून डोके फोडले


बाभूळगाव ता प्र शहज़ाद शेख

घराच्या जागेवरून झालेल्या वादात एकाचे डोके फोडल्याची घटना दाभा येथे दि.25 एप्रिल रोजी घडली.

अन्सार अली शौकत अली हेे त्यांच्या घरा समोरील रोड वर उभे असतांना आरोपी दीपक रामेश्वर बान्ते हे हातात काडी घेऊन आले व माझा आई सोबत का वाद केला या कारणावरून हातातील काठीने फिर्यादी अन्सार अली यांच्या डोकावर प्रहार केला यात अन्सार अली यांचा डोक्याला मार लागल्याने डोके फुटले.

या घटनेची लेखी तक्रार बाभूळगाव पोलीस ठाण्यात अन्सार अली यांनी दिली असून आरोपी दीपक रामेश्वर बान्ते, सुनीता रामेश्वर बान्ते विकी अवधूत बान्ते या तिघांवर पोलिसांनी 324,504,506,34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अधीक तपास पोलीस करीत आहे

Updated : 26 April 2021 12:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top