Home > Crime news > चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात
X

हिंगणघाट/वर्धा प्रतिनिधी
इकबाल पहेलवान

दि.२५ एप्रिल
सेवाग्राम हॉस्पीटल येथील कोविड सेन्टर मधील जिल्हा कारागृहातील चोरीच्या गुन्हयातील पसार आरोपीस हिंगणघाट पोलिसांच्या डी.बी. पथकाने कर्नाटकातील बिदर येथुन काल दि.२४ रोजी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

हिंगणघाट पोलिस ठाण्याअंतर्गत अप क्र. ३४७/२०२१ कलम ३७९, ३४ भादंविच्या गुन्हयात आरोपी मोहम्मद शबिर मोहम्मद शब्बीर (१९) रा. जहीराबाद, तेलंगाना या इराणी टोळीतील आरोपीस अटक करण्यात आली होती.

तो जिल्हा कारागृह,वर्धा येथे बंदीस्त होता. त्यास न्यायालयीन कोठडी दरम्यान कोविड-१९ ची लागण झाल्याने पुढील उपचार करीता कस्तुरबा

हॉस्पीटल, सेवाग्राम येथे भरती करण्यात आले होते. दिनांक २२ रोजी कोरोना उपचारादरम्यान सदर आरोपी कोविड कक्षातुन फरार झाला होता. यासंबधात पोस्टे सेवाग्राम येथे अप क्र. २००/२०२१ कलम २२४,२६९ भादंविचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कोरोनाबाधित आरोपी फरार होताच त्याचा हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा शेखर डोंगरे यांचे चमुने सदर आरोपीचा पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत पाढंरकवडा जिल्हा यवतमाळसह तेलांगाना राज्यातील आदिलाबाद, निर्मल, निजामाबाद, जहीराबाद अश्या विविध ठिकाणी शोध घेऊनसुद्धा सापडला नाही.

पुढील माहीतीच्या आधारे आरोपीचा कर्नाटक राज्यातील बिदर येथे स्थानिक पोलीसांच्या मदतीने शोध घेतला असता

सदर आरोपी बिदर (कर्नाटक) येथे आढळला. आरोपीस ताब्यात घेत हिंगणघाट पोलिसांनी सदर आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी सेवाग्राम पोलिसांकड़े हस्तांतरीत केले.

सदर आरोपी हा सराईत इराणी टोळीचा गुन्हेगार असुन, त्याचे विरूध्द विविध राज्यात बरेचसे गुन्हे नोंद आहेत, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या चमुने सदर कारवाई केली आहे.

Updated : 25 April 2021 11:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top