वडकी पोलीस स्टेशची धडक कारवाई, हजारो रूपयांची गावठी दारू जप्त.
X
संजय कारवटकर राळेगाव तालुका प्रतिनिधी, 7499602440,
यवतमाळ/ राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावामध्ये वडकी पोलीस स्टेशन च्या पथकाने धाडी टाकून हजारो रुपये किमतीची गावठी दारू सह अवैध देशी दारू जप्त केली असून काही महिला आरोपीसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे हि कार्यवाही 22 व 23 एप्रिल रोजी करण्यात आली, लाॅकडाऊनच्या काळात संपुर्ण जिल्ह्यात देशी व विदेशी दारूचे दुकाने बंद असल्याच्या फायदा घेत वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दहेगाव, मंगी, पिंपळापुर, तथा वाढोणा बाजार येथे वडकी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पि एस आय मंगेश भोगाडे, अशोकराव भेडाळे, आकाश कोदुशे यांनी धडक कारवाई करून अंदाजे 10000 रूपयाचा मोह फुलांचा 8 पिपे सहीत दारू च्या माल पकडण्यात आला आहे कार्यवाही एस पी डाॅ. दिलीप भुजबळ पाटील, एस. डि पि. ओ. प्रदिप पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे