Home > Crime news > मानसिक संतुलन बिघडलेल्या युवकाने कु-हाडीने वार करून दोघांना केले ठार, आई, बहिनसह तीन जण गंभीर जखमी

मानसिक संतुलन बिघडलेल्या युवकाने कु-हाडीने वार करून दोघांना केले ठार, आई, बहिनसह तीन जण गंभीर जखमी

मानसिक संतुलन बिघडलेल्या युवकाने कु-हाडीने वार करून दोघांना केले ठार, आई, बहिनसह तीन जण गंभीर जखमी
X

पुसद तालुक्यातील कारला देवस्थान येथे मानसिकता गमविलेल्या युवकाने दि.१९ एप्रिलच्या पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान सर्वच जण झोपत असताना मोठया बापासह सख्या मामावर कुऱ्हाडीने हल्ला करून जागीच ठार केल्याची खळबळजनक घटना घडली युवक हा तेवढयावरच न थांबता त्याने घरातील झोपलेल्या आई, बहिण व काकासह शेजारी महिलावरही हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. जखमीवर येथील उपजिल्हा रूग्णात उपचार सुरू झाला असुन दोघांची यात प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला ग्रामिण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

गोकुळ विलास राठोड वय २३ वर्षे रा.कारला असे त्या आरोपी युवकाचे नाव आहे. तर वसंता जेठा राठोड वय ६० वर्षे रा.कारला हा त्याचा वडीलाचा मोठा भाऊ तर मेरचंद शामा आडे वय ७० वर्षे राहणार उपनवाडी हा त्याच्या आत्याचा नवरा असे दोन मृतकाचे नाव आहे. सविस्तर घटना अशी कि गोकुळ राठोड या युवकाचे गेल्या काही दिवसापासुन मानसिक संतुलन बिघडले असल्याची चर्चा गावात सुरू आहे. दि. १९ एप्रिलच्या सकाळी ३.३० वाजता गोकुळ राठोडचे मानसिक संतुलन बिघडले व त्याने घरात ठेवलेली कुऱ्हाडीने आई सुनिता विलास राठोड व बहिण अश्विनी विलास राठोड वय १४ वर्षे यांच्यावर सपासप वार करणे सुरू केले आई व बहीण वेळेवर जागी झाल्याने त्यांचा जिव थोडक्यात वाचला व नंतर बाहेर अंगणात झोपलेले त्याचा मोठे बाबा वसंता जेठा राठोड यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून जागीच ठार केले. त्यानंतर त्यांच्याच बाजुला झोपलेल्या त्याचा मामा मेरचंद शाम आडेवर कु-हाड घालुन त्यांनाही जागीच ठार केले. त्यानंतर गोकुळ आरडाओरड करीत घरा बाहेर झालेपलेल्या त्याच्या शेजारी राहणारे यशोदा गणेश जाधव वय ४५ वर्षे यांच्यावर वार करीत जखमी केले. यशोदा च्या वेळेवर जाग्या झाल्याने त्या थोडक्यात बचावल्या. त्यानंतर आरोपीने त्याच्या बाहेर झोपलेल्या काकावर वार करीत असतांना त्यांनी हात आडवा केल्याने त्यांच्या हाताला व शरिरीरावर कु-हाडीचा वार लागला त्यात त्यांनाही गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर सर्व गाव जागी झाल्यानंतर त्याला त्याच्या गावात राहणाऱ्यांनी बांधून ग्रामिण पोलीस स्टेशनला माहिती दिली. आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्याची प्रकिया सुरु होती. गावचे सरपंच राजेश राठोड यांनी आरोपीचे माणसीक संतुलन बिघडल्यामुळे हे भयानक कृत्य केल्याचे सांगितले आहे. घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली असुन सोमवारचा दिवस काळा दिवसांनी उजाडला असुन गावात भितीचे वातावरण पसरले आहे. आरोपीने असे कृत्य का केले याबाबत ग्रामिण पोलीसांकडुन माहिती घेणे सुरू केले आहे..

Updated : 19 April 2021 11:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top