Home > Crime news > पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त भरणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त भरणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

६२,२००/- रुपयाची दारु जप्त

पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त भरणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही
X

फुलचंद भगत

वाशिम:-दिनांक २१/०४/२१ रोजी रामनवमी निमित्त बंजारा समाजाची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मानोरा तालुक्यातील ग्राम पोहरादेवी येथे दरवर्षी प्रमाणे यात्रा भरते परंतु कोराना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन रामनवमीला भरणारी यात्रा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये रदद करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिनांक १२/०४/२१ रोजी निर्गमित केले असुन पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज संस्थान व उर्मी खुर्द ता. मानोरा यांना केंद्र स्थानी ठेवनु चारही दिशाना ५ किमी अंतरापर्यतच्या परिसिरात कलम १४४ लागु करण्याबाबतचे आदेश दिनांक १४/०४/२१ रोजी निर्गमित झालेले आहेत.


पोहरादेवी व उमरी खुर्द भागात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच लोकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालुन दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक श्री.वसंत परदेशी यांनी दिनांक १४/०४/२१ रोजी पोलीस ठाणे मानोरा, पोहरादेवी उमरी खुर्द येथे भेट देऊन आढावा घेतला व पोलिस निरिक्षक शिवाजी ठाकरे यांना वरील बंदोबस्ताचे अनुषंगाने सुचना निर्गमित केल्या.पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी/अंमलदार यांचे दोन वेगवेगळे पथक तयार करुन ग्राम पोहरादेवी भागात रवाना केले. सदर पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी ग्राम उर्मी खुर्द येथे जाऊन उर्मी खुर्द येथील अनिता भिमराव इंगोले यांचे रहाते घरी पोलीस ठाणे मानोरा येथील अधिकारी/अंमलदार यांचे सह जाऊन छापा टाकला त्यामध्ये ५० लिटर गावठी हातभटटीची दारु व ३०० लिटर सडवा मोहा माच असा एकुण ४०,१००/- रुपयाचा माल जप्त करुन मोक्यावर नाश केला. तसेच अरविंद अंबादास राठोड राहणार उर्मी खुर्द यांचे रहाते घरी छापा टाकला असता २० लिटर गावठी हात भटटीची दारु व २०० लिटर सडवा मोहा माच असा एकुण २२,१००/- रुपयाचा माल जप्त करुन मोक्यावर नाश केला.वरील दोन्ही व्यक्ती विरुध्द पोलीस ठाणे मानोरा येथे कलम ६५ ई फ म.दा.का अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदर कार्यवाहीत पोउपनि खंडार,पंडीत सपोउपनि भगवान गावंडे,पोना सुनिल पवार,प्रशांत राजगुरु,मुकेश भगत,पोकॉ राजेश गिरी,निलेश इंगळे,किशोर खंडारे, राम नागुलकर, महिला पोलीस अंमलदार तेहमिना शेख, रेश्मा ठाकरे यांनी सहभाग नोंदविला.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी,अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय कुमार चव्हाण, पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

Updated : 16 April 2021 8:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top