Home > Crime news > तालुक्यातील अवैध वाहतूक ठरत आहे सुपर स्प्रेडर.

तालुक्यातील अवैध वाहतूक ठरत आहे सुपर स्प्रेडर.

अवैध वाहतूक वर पोलीस प्रशासनाचा मोन कायम.

तालुक्यातील अवैध वाहतूक ठरत आहे सुपर स्प्रेडर.
X


वाशिम.दि.१३/०४/२०२१

रिसोड तालुक्यातील रिसोड - मेहकर मार्गावर अवैध वाहतूक कालीपिली च्या माध्यमातून सर्रास सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट असे की तालुक्यातील जनते साठी पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई करीत आहे व दुसऱ्या बाजूने बघितलं तर अवैध वाहतुकीला चालना देण्याचा काम सुरू आहे.

रिसोड ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता रिसोड लोणार आणि रिसोड मेकर अशी दोन मार्गे आहेत.सद्या महाराष्ट्रा मध्ये कोरोना तीव्र गतीने पसरत आहे. या दोन्ही मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून अवैध वाहतूक जोमात सुरू आहे. रिसोड तालुक्यात ही अवैध वाहतूक इतकी जास्त प्रमाणात आहे की एका कालीपिली मध्ये पंधरा ते वीस प्रवासी बसवले जात आहे. ह्या अश्या अवैध प्रवासामुळे कोरोना जास्त वेगाने पसरण्याची दाट शक्यता आहे.
शासनाने प्रत्येक दुकानांवर व धंद्यांवर कडक निर्बंध घातलेले आहेत व फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठीच बाजार पेठ सध्या सुरू आहे. जनतेकडून असा प्रश्न निर्माण होत आहे की ह्या अवैध वाहतुकीला परवाने व मान्यता कोणी दिली? एसटी महामंडळ मध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवासी बसवण्यासाठी शासनाने सांगितले आहे. ह्या कालीपिली चालकांनी स्वतःच्या लालसेपोटी लोकांच्या जीवनाशी खेळण्याची परवानगी कोणी दिली. एकीकडे जनतेला कोरूना चे कडक निर्बंध व दुसरीकडे अवैध वाहतुकीला चालना देणे हे काय योग्य आहे का अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. ह्या अवैध प्रवासामुळे कोरोना वाशिम जिल्ह्यातून बुलढाणा जिल्ह्यात व बुलढाणा जिल्ह्यातून वाशीम जिल्ह्यात पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या गंभीर विषयाकडे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस व पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी स्वताहुन लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Updated : 2021-04-13T20:11:00+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top