Home > Crime news > मंगरुळपीर येथील पत्रकार बालू काळे वर तडीपारीची कारवाई

मंगरुळपीर येथील पत्रकार बालू काळे वर तडीपारीची कारवाई

मंगरुळपीर येथील पत्रकार बालू काळे वर तडीपारीची कारवाई
X

वाशिम:-मंगरुळपीर येथील पत्रकार संतोष उर्फ बाळु दिनकर काळे वय ४५ वर्ष रा.संभाजी नगर मंगरुळपीर याचेवर उपविभागीय अधिकारी यांचे ता. १२ च्या आदेशानुसार पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळे बाबत उपविभागीय दंडाधिकारी मंगरुळपीर एस.वि. मुळे यांचे आदेश फौजदारी कलम 56 ( अ ) ( ब ) मु.पो कायदा मौजे मंगरुळपीर अन्वये दि १२/४/२०२१ पासुन वाशिम जिल्हातुन एक वर्षा करीता हद्दपार करण्याचा आदेश प्राप्त झाला. त्या अनुषगाने संतोष उर्फ बाळु दिनकर काळे यांना पो स्टे ला बोलावुन घेवुन ठाणेदार धनजंय जगदाळे यांचे समक्ष आदेशाची प्रत तामील करण्यात आली. त्यांचा प्रश्नउत्तर फार्म भरुण घेण्यात आला असता हद्दपारी काळात ते कोठे राहणार यांचा जबाब नोंदविला असता त्यांचे नातेवाईक पातुर जि . अकोला तेथे जावुन राहणार असल्याचे सांगीतले.एक वर्ष त्यास जिल्ह्याबाहेर राहावे लागणार असून या कालावधीत वाशीम जिल्ह्यात असल्याची तक्रार आल्यास नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Updated : 13 April 2021 12:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top