Home > Crime news > बोरगाव आर्णी रोडवर भीषण अपघात परिचरचा जागीच मृत्यू

बोरगाव आर्णी रोडवर भीषण अपघात परिचरचा जागीच मृत्यू

बोरगाव आर्णी रोडवर भीषण अपघात परिचरचा जागीच मृत्यू
X

यवतमाळ / आर्णी : बोरगाव अंजी आर्णी रोड दरम्यान विठोली फाटा येथे भिषण अपघात झाला असून सदर अपघात हा अज्ञात वाहन आणि दुचाकी या वाहनांमध्ये झाला.


विरेंद्र श्रिरंग जंगम वय 45 रा. गुरुकुंज सोसायटी आर्णी हा आज दुपारी 3 वाजता शेतीचे कामा करीता कारेगाव अंजी (नाईक) येथे गेला होता संध्याकाळी ७ :३० च्या दरम्यान विरेंद्र जंगम हे कारेगाव अंजी येथून आर्णी येथे घरी मोटर सायकल क्र. एम एच २९ ए एस २११८ ने परत येत असतांना विरेंद्र यांच्या वडिलांना श्रीरंग जंगम यांना कोणी तरी फोन करुन सांगीतले की मोटर सायकल क्र. एम एच २९ ए एस २११८ ला कोणत्यातरी चार चाकी अज्ञात वाहनाने धडक दिली तुम्ही लवकर या असे सांगीतले असता मृतक चे भाऊ व त्याचे नातलगांनी विठोली फाट्या जवळ जाऊन पाहीले असता विरेंद्र जंगम रोडवर पडून दिसला व त्याची मोटर सायकल बाजुला पडून दिसली त्याच्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याच्या डोक्याला, पाटीला, हाताला जबर मार लागुन जागीच मरन पावला त्यावेळी लगेच तिथे पोलीस आले त्यांच्या मदतीने व गावातील गौतम घरडे यांच्या मदतीने विरेंद्र जंगम यांना आर्णी येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले

त्याच्या मोबाईल वरुन रोडवरून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने दुचाकी क्र.mh 27 BP 5589 ला धडक दिल्याने दुचाकी चालक निखिल हरिभाऊ पांडे याचा जागीच मृत्यू झाला.तर सूरज हरिभाऊ चव्हाण हा गंभीर जख्मी झाल्याने उपचारासाठी अमरावती येथे दाखल करण्यात आले व मृतक निखिल याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय मोर्शी येथे शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आला. अज्ञात ट्रक चालकाचे विरुद्ध अपराध क्र.164 कलम 279,304 (अ),आणि 338 भादवी या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.का. त्र्यंबक काळे व पोलिस स्टेशन मोर्शी करत आहे .

Updated : 12 April 2021 5:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top