Home > Crime news > पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

चारित्र्याच्या संशयावरून केली होती पत्नीची हत्या

पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
X

मंगरुळपीर चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना ता १० रोजी तालुक्यातील मानोली येथे घडली होती.पोलिसांनी या आरोपी पतीस ता ११ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीकृष्ण वाकोडे वय ५१ रा आरखेड ता मूर्तिजापूर यांनी पोलिसांत तक्रार दिली की,आरोपी रोशन विजय उगले वय २५ रा मानोली याने त्याची पत्नी रिना रोशन उगले वय २० हिस ता १० रोजी चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी पाईपने तसेच फरशीवर डोके आदळून ठार मारले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली होती.दरम्यान ता ११ रोजी या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी एपीआय निलेश शेंम्बडे यांनी आरोपी पतीस वाशीम येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Updated : 12 April 2021 7:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top