Home > Crime news > चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीस अटक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीस अटक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीस अटक
X

मंगरुळपीर:- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना १० एप्रिल रोजी तालुक्यातील मानोली येथे घडली आहे. फिर्यादी श्रीकृष्ण वाकोडे (वय ५१) रा. आरखेड ता. मूर्तिजापूर यांनी पोलिसांत तक्रार दिली की, आरोपी रोशन विजय उगले (वय २५) रा. मानोली याने त्याची पत्नी रिना रोशन उगले (२०) हिला १० एप्रिल रोजी चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी पाईपने तसेच फरशीवर डोके आदळून ठार मारले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास एपीआय निलेश शेंम्बडे करीत आहेत.

Updated : 12 April 2021 6:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top