Home > Crime news > दहशत पसरविणार्‍या तरुणाला शास्त्रसह अटक

दहशत पसरविणार्‍या तरुणाला शास्त्रसह अटक

दहशत पसरविणार्‍या तरुणाला शास्त्रसह अटक
X

यवतमाळ : शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला शस्त्रांसह अटक करण्यात आली. ही कारवाई आज दुपारच्या सुमारास यवतमाळ शहर पोलिसांनी महात्मा फुले चौक पार्टी पूरा येथे केली.

निखिल किशोर वंजारी (27) राहणारा अशोक नगर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. संबंधित आरोपी हा महात्मा फुले चौक पाटीपुरा येथे भरदिवसा चाकूचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरवीत होता. स्थानिक यवतमाळ शहर पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. तसेच आरोपीविरुद्ध शस्त्रबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Updated : 24 March 2021 6:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top