Home > Crime news > म-मराठी न्युज इफेक्ट अवैध दारु विक्रेत्यावर आर्णी पोलिसांची कारवाई

म-मराठी न्युज इफेक्ट अवैध दारु विक्रेत्यावर आर्णी पोलिसांची कारवाई

म-मराठी न्युज इफेक्ट अवैध दारु विक्रेत्यावर आर्णी पोलिसांची कारवाई
X

यवतमाळ/आर्णी : 20 मार्च रोजी म-मराठी न्युज ने अवैध धंदे बाबत बातमी प्रकाशित केली होती दुसर्या दिवशी पोलिस अधिक्षक यांनी आर्णी पोलिस स्टेशनला भेट दिली त्यानंतर अवैध दारु विक्रेतेवर कारवाई करणे करीता तालुक्यातील अबोडा येथे दोन ठिकाणी पोलिसांनी धाड मारून 150 पवे जप्त करून दोन आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

आर्णी पोलीस स्टेशनचे एन पी सी मनोज चव्हाण, अक्षय ठाकरे, मिथुन जाधव, तुषार जाधव यांना अंबोडा येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून आज सायंकाळी 6 वाजता पांडुरंग मुरारी चव्हाण, सुधाकर लक्ष्मन आडे दोघे रा अबोडा यांच्या घरात जावून झडती घेतली असता एकूण 150 देशी दारूचे अवैध पववे किंमत 4500 रु जप्त करून या दोघा विरिद्ध दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केले. ही कारवाई ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार पो का मनोज चव्हाण, अक्षय ठाकरे, तूशार जाधव, मिथुन जाधव यांनी केली.

Updated : 22 March 2021 4:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top