Home > Crime news > चाकुने वार करून धर्माबादच्या आडत व्यामापा-यास लुटले

चाकुने वार करून धर्माबादच्या आडत व्यामापा-यास लुटले

चाकुने वार करून धर्माबादच्या आडत व्यामापा-यास लुटले
X

बिलोली तालुक्यातील कासराळी परिसरातील घटना
बिलोली दिं.०५ मार्च 2021रोजी

बिलोली येथील वसुली करून दुचाकीवरून नायगाव कडे जाणा-या धर्माबाद येथील आडत व्यापा-यास कासराळी व रामपूर पाटी जवळ नर्सी कडून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी आडवून व्यापा-याच्या मांडीवर चाकुचा वार करून २८३००रु.रक्कम हिसकावुन पसार झाले.याबाबत आडत व्यापारी भरत भालेराव (४९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

धर्माबाद येथील आडत व्यापारी भरत बाबाराव भालेराव (४९) हे दिं.०५ मार्च रोजी बिलोली शहरातील व्यापा-यांकडून आडतीची रक्कम वसुली करून दुपारी तिनच्या दरम्यान बिलोलीहून नायगावकडे पुढील वसुलीसाठी जात होते. कासराळी पासून कांहि अंतरावर असलेल्या रामपूर पाटी जवळ आले असता नर्सी कडून दुचाकीवर येणा-या तिघांनी सदर व्यापा-यास आडवून चाकुचा धाक दाखवून पैशाची मागणी केली त्यावर सदरील लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी भरत भालेराव यानी तेथून पळ काढला आसता त्या तिघांनीही आडत व्यापा-याचा पाठलाग करून एकाने त्यांच्या डाव्या मांडीवर चाकुने वार केला दुस-याने त्यांचे हाथ धरले तर तिस-याने त्यांच्या खिशातील २८३०० रु.काढुन घेतले तद्नंतर तिघेही बिलोलीच्या दिशेने पसार झाले.जख्मी अवस्थेत असलेल्या व्यापा-याला सामाजिक कार्यकर्ते गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे बेळकोणी येथील बळीराम पोशेट्टी मुधोळकर यांना कळविले व ग्रामीण रुग्णालय बिलोली या ठिकाणी दाखल करण्यासाठी सांगितले . आडत व्यापारी भरत भालेराव बाबुराव यांच्या तक्रीवरून सदरील अज्ञात तिघां लुटारू विरोधात ३९४,३४ भा.द.वि.नुसार बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.नि.शिवाजी डोईफोडे हे करीत आहेत.


Updated : 6 March 2021 2:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top