Home > Crime news > अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याने एकच खळबळ,मालेगाव तालुक्यातील घटना

अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याने एकच खळबळ,मालेगाव तालुक्यातील घटना

अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याने एकच खळबळ,मालेगाव तालुक्यातील घटना
X

अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याने एकच खळबळ,मालेगाव तालुक्यातील घटना

वाशिम :- मालेगाव तालुक्यातील ग्राम धमधमी स्मशानभूमी जवळ अज्ञात मृतक इसम दिसून आल्याची माहिती मिळताच जऊलका पोलीस घटना स्थळी पोहचून सदरील मृतक 18 ते 23 वयोगटातील असून अंगावर फक्त चेक्स असलेला रुमाल व हातात मध्ये काळा व हिरवा धागा बांधलेला असून अज्ञात इसम बाहेरच्या राज्यातील असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या भागात समृध्दी रोड चे व रेल्वे ची कामे मोठ्या प्रमाणात चालू असून सदरील इसम कामासाठी आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे ..घटना स्थळी श्वानपथक ठसा तज्ञ कसून तपास करीत असून जऊळका रेल्वे चे ठाणेदार अजिनाथ मोरे यांचा सह त्यांचे सहकारी घटनास्थळी पंचनामा करीत असून पोलिसांसमोर अज्ञात इसमाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान आहे.

प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 6 March 2021 8:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top